किडनी स्टोनसाठी ऑपरेशन करताय ? ‘कुळीदा’च्या पाण्यानं दूर होईल समस्या ! ‘असा’ करा वापर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकजणांना किडनी स्टोनची समस्या उद्भवत असते. काही जण यासाठी ऑपरेशन देखील करतात. ऑपरेशन करण्याची गरज पडू नये यासाठी आपण किडनी स्टोनवर काही उपाय जाणून घेणार आहोत. काही खर्च न करताही किडनी स्टोन बरा केला जाऊ शकतो.

कुळीद हे कडधान्य बहुतेकांना माहित आहे. अनेकजण याचं सेवन करत असतात. या डाळीच्या सेवनानं किडनी स्टोन बाहेर पाडण्यास मदत होते.

कुळीदात असणारे पोषक घटक किडनी स्टोन काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतात. यात फेनोलिक कंपोनेंट, फ्लेवोनोईड्स, स्टेरॉईड आणि सॅपोनिन असतं. याचा वापर कसा करायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी पुढील प्रमाणे कृती करा.

1) कुळीदाची डाळ स्वच्छ धुवून घ्या. यासाठी 200 मिली पाण्यात 25 ग्रॅम डाळ घालून ते मिश्रण उकळून घ्या.

2) पाणी आटल्यानंतर अर्ध होईल तेव्हा गॅस बंद करा.

3) थंड झाल्यानंतर आता हे पाणी गाळून घ्या.

4) यानंतर तुम्ही या पाण्याचं सेवन करू शकता.

सतत 1-2 महिने हा प्रयोग केल्यास तुम्हाला फरक दिसून येईल. तुम्ही नियमितपणे याचं सेवन करू शकता. खास बात अशी की, याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.