आता लँडलाईन नंबरवरूनही करा व्हॉट्सॲप चॅटिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल नेट्वर्किंग साईट्सपैकी सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग साईटस म्हणजे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपने आपलया ग्राहकांकरिता नेहमी नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सॲपने नवीन फीचर लाँच केलं आहे. यामध्ये लँडलाईन नंबरही व्हॉट्सॲपला कनेक्ट करता येईल. यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणासोबत शेअर करण्याचीही गरज लागणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचा फायदा हा WhatsApp Business App युजर्सना अधिक होणार आहे. या फीचरच्या मदतीने व्यावसायिक आपल्या लँडलाईन नंबरवरून अगदी सहज व्हॉट्सअ‍ॅप ऑपरेट करू शकतात. तसेच या फीचरचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्सचा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला नको असलेल्या लोकांसोबत शेअर करता येत नाही.

असे करा लँडलाईन नंबरसोबत व्हॉट्सॲप कनेक्ट करा
सर्वप्रथम युजर्सना आपल्या स्मार्टफोनमध्ये नॉर्मल व्हॉट्सॲप किंवा WhatsApp Business App डाऊनलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर व्हॉट्सॲप स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपवर ओपन करा.

व्हॉट्सॲप ओपन केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप युजर्सकडे कंट्री कोड आणि मोबाईल नंबर मागतं. त्यावेळी लँडलाईन नंबर एंटर करा.

नंबर एंटर केल्यानंतर युजर्सचा नंबर व्हेरिफाय केला जाईल. त्यासाठी कॉल अथवा मेसेज पाठवला जाईल. त्यासोबतच त्यानंतर Call Me चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू होईल.

कॉल ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या लँडलाईन नंबरवर एक कॉल येईल. तो कॉल रिसीव्ह केल्यावर ६ डिजीटवाला एक व्हेरिफीकेशनवाला कोड सांगितला जाईल. त्यानंतर तो कोड टाकून पुढची प्रोसेस करा. तसेच प्रोफाईल फोटो, नाव आणि विचारण्यात आलेले इतर काही डिटेल्स देऊन सोप्या पद्धतीने व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू शकता.