देशभरातील लोकांपर्यंत कशी पोहचणार ‘कोरोना’ची लस, मोदी सरकार डिसेंबरमध्ये तयार करणार ‘ब्लूप्रिंट’

नवी दिल्ली : केंद्र सरकार राज्यांसोबत मिळून डिसेंबर महिन्यात कोरोना व्हॅक्सीन देशभरात पोहचवणे आणि लोकांना देण्यासाठी आराखडा तयार करणार आहे. यासाठी सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये सुद्धा तयारी सुरू झाली आहे, जे आपआपल्या स्तरावर यावर कामात सहभागी झाले आहेत. कोल्ड स्टोरेज चेनपासून व्हॅक्सीन पोहचवण्याची सर्व तयारी केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी शनिवारी देशात व्हॅक्सीन तयार करत असलेल्या तीन प्रमुख संस्थांचा दौरा करून त्यांच्या प्रगतीची माहिती घेतली आहे. पंतप्रधानांच्या सक्रियतेसह गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसोबत व्हॅक्सीनबाबत प्राथमिक तयारी सुरू केली आहे. कारण देश आणि परदेशात जी व्हॅक्सीन तयार होत आहे त्यांची विविध मानकं आहेत. या व्हॅक्सीन विविध तापमानावर साठा करून ठेवण्याची गरज आहे. अशावेळी सर्व प्रकारच्या स्थितीनुसार साठवण आणि लोकांपर्यंत पोहचवण्याची तयारी केली जात आहे. भारतात तयार होत असलेल्या वॅक्सीनला तेवढ्या कमी तापमानाची गरज नाही, जेवढी परदेशात तयार व्हॅक्सीनला गरज आहे.

सूत्रांनुसार, ट्रायलच्या विविध टप्प्यातून जात असलेल्या व्हॅक्सीन जानेवारी महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अशावेळी सरकारचा प्रयत्न असणार आहे की पुढील वर्षाच्या सुरूवातीला तीन महिन्यात प्रत्येक व्यक्तीला व्हॅक्सीन देण्यात यावी. यासाठी डिसेंबर महिना सर्वात महत्वाचा आहे, ज्यामध्ये सरकार कोरोना संसर्ग रोखण्यासाठी टेस्टिंग वाढवण्यासह व्हॅक्सीनची रूग्णांवर ट्रायल वाढवणे आणि ती देशभरात पोहचवण्याचा आराखडा तयार करत आहे.

केंद्र सरकारची जवळपास अर्धा डझन मंत्रालये याच्याशी जोडीली गेली आहेत. गृह आणि आरोग्य मंत्रालयासह दूरसंचार, पोस्ट, कृषी, रेल्वे, रस्ते वाहतूक यासारखी मंत्रालये सुद्धा महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत. सूत्रांनुसार जर वॅक्सीन जानेवारी महिन्यात उपलब्ध झाली तर सरकार मार्चपर्यंत ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेल. मात्र, हे व्हॅक्सीनच्य उत्पादनावर अवलंबून असणार आहे.