Live Howdy Modi : गरबा, भांगड्याने कार्यक्रमाला सुरुवात (व्हिडीओ)

ह्युस्टन : वृत्तसंस्था – ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमासाठी मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. ह्युस्टनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाकडे भारत आणि अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकत्र येणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हाऊडी मोदी या कार्य़क्रमाची सुरुवात गरबा आणि भांगडा या कार्य़क्रमांनी झाली.

ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियमध्ये हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला तब्बल 50 हजार भारतीय आणि अमेरिकी नागरिक उपस्थित राहणार आहेत. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. रात्री नऊ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमानंतर मोदी आणि ट्रम्प उपस्थितांना संबोधित करणार आहेत. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता कार्यक्रमाची समाप्ती होईल.

सांस्कृतीक कार्यक्रमांना सुरुवात


भरतनाट्याने हाऊडी मोदी कार्यक्रमाला सुरुवात


एनआरजी स्टेडिअममध्ये ढोल ताशांचा गजर