PM मोदी आणि ट्रम्प यांना थांबवून सेल्फी घेणारा ‘हा’ मुलगा कोण ? मोदींनी थोपटली त्याची पाठ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदींनी रविवारी अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर ह्यूस्टनमध्ये 50 हजार अनिवासी भारतीयांना हाउडी मोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून संबोधित केले. या दरम्यान जेव्हा हे दोन्ही नेते मंचाकडे जात होते तेव्हा एका 9 वर्षाच्या मुलाने त्यांना अडवले आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्या मुलाच्या आग्रहानंतर या दोन्ही नेत्यांनी या मुलाच्या आनंदासाठी त्याच्याबरोबर एक सेल्फी क्लिक केला. यानंतर हा मुलगा एका रात्रीत प्रसिद्ध झाला. सोशल मिडियावर या मुलाची दिवसभर चर्चा रंगली.

कार्यक्रम संपल्यानंतर दोन्ही नेते एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालत होते तेव्हा एका मुलाने त्यांच्यासह सेल्फी क्लिक केला यानंतर हा मुलगा कोण अशी चर्चा सुरु झाली.

मोदींनी मुलाची पाठ थोपटली –
मोदी आणि ट्रम्प या मुलाच्या हातातील मोबाइल पाहून थांबले. त्यांनी मुलाला काहीतरी विचारले. त्यानंतर मोदी पुढे आले पण ट्रम्प तेथेच थांबले. नंतर मोदी देखील तेथे गेले आणि त्यांनी त्या मुलाबरोबर सेल्फी काढला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्या मुलाची पाठ थोपटली तर ट्रम्प यांनी त्याच्याशी हात मिळवला.

या मुलाचे नाव आहे सात्विक हेगडे
या सेल्फी घेणाऱ्या मुलाचे नाव सात्विक हेगडे असल्याचे कळते आहे. तर या मुलाच्या आई, वडिलांचे नाव मेधा हेगडे, प्रभाकर हेगडे आहे. ते कन्नड जिल्ह्यातील आहेत. मुलाला योग करण्याची खूपच आवड आहे. योग कार्यक्रम संपल्यानंतर सात्विक लाइनमध्ये उभा होता आणि तेव्हा ट्रॅम्प आणि मोदी यांच्यासह सेल्फी काढण्याची सुवर्ण संधी त्याला मिळाली.

Visit : policenama.com

You might also like