‘ट्विट-रिट्विट’ करत उत्साहात बोलले ट्रम्प – ‘मित्र मोदींबरोबर आजचा दिवस शानदार असणार’, मोदींनी दिल ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हाउडी मोदी’ सोहळ्याला पोहोचण्यापूर्वी एका वृत्तसंस्थेच्या ट्विट ला उत्तर देत ते रिट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी ‘हाउडी मोदी’ मध्ये सहभागी होण्यासाठी उत्साह व्यक्त केला. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मी ह्यूस्टनमध्ये मी माझ्या मित्राबरोबर असणार आहे. आजचा दिवस टेक्साससाठी एक उत्तम दिवस असेल.’

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट रिट्विट केले आणि म्हटले की, “हो, हा नक्कीच चांगला दिवस असेल. मी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.”

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी भारतीय समाजातील हजारो लोक एनआरजी स्टेडियमवर पोहोचले आहेत. या निमित्ताने एनआरजी स्टेडियमवर उत्साह आणि उत्सवाचे वातावरण आहे. बहारदार कार्यक्रम सादर केले जात आहेत. भारतीय समाजातील महिला आणि पुरुष रंगीबेरंगी पारंपारिक वेशभूषेत दिसतात.

स्टेडियममध्ये ढोल वाजवले जात आहेत आणि लोक मोदी-मोदी यांच्या घोषणा देत आहेत. एनआरजी फुटबॉल स्टेडियमवर आयोजित या सोहळ्याचे आयोजन टेक्सास इंडिया फोरम (टीआयएफ) या NGO तर्फे केले गेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियमवर ५० हजार लोकांच्या जमावाला संबोधित करतील. दुसर्‍या देशाचा नेता पहिल्यांदाच अमेरिकेत इतका मोठा कार्यक्रम करीत आहे. या कार्यक्रमाला ‘हाउडी मोदी’ असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहतील.

Visit – policenama.com