15 ऑगस्टनंतर सुरु होणार शाळा-महाविद्यालये, मानव संसाधनमंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी केली घोषणा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूच्या साथीमुळे मार्चपासून दिल्लीतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाईन अभ्यास घेतले जात आहेत, परंतु कुठेतरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. त्यामुळे आता शाळेबद्दल दिलासादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या कित्येक आठवड्यांच्या गोंधळानंतर मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी सांगितले आहे की, ऑगस्ट 2020 नंतर शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू केली जातील. 15 ऑगस्ट 2020 नंतर शैक्षणिक संस्था उघडतील. डॉ.रमेश पोखरियाल यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, “15 ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.”

या संदर्भात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एचआरडी डॉ. रमेश पोखरीयाल निशंक यांना शाळा पुन्हा सुरू करण्याच्या योजनेवर पत्र पाठविले. काल त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

आपल्या पत्रात त्यांनी लिहिले की, “कोरोनाच्या सहअस्तित्वला स्वीकारण्याची आणि देशातील शाळांची भूमिका नव्याने ठरविण्याची वेळ आली आहे.” शाळांना साहसिक भूमिकांसाठी तयार केले नाही तर ही आपली ऐतिहासिक चूक असेल, शाळांची भूमिका केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित राहणार नाही तर मुलांना जबाबदार आयुष्य जगण्यासाठी तयार करणे देखील आहे.

मनीष सिसोदिया यांनी आपल्या पत्रात लिहिल्या या गोष्टी

–   कोरोनाबरोबर रहाताना जगात शिक्षणामध्ये मोठे बदल घडतील, आपल्या आवश्यकतेनुसार शाळा पुन्हा उभ्या केल्या पाहिजेत, अन्य देशांनी काहीतरी करण्याची आपण वाट पाहू नये, मग आम्ही त्याची कॉपी करू.

–   आपण आपल्या मुलांना एक चांगले आणि अधिक काळजी घेणारी शाळा दिली पाहिजे.

–   सर्व स्टेकहोल्डर्ससोबत सल्लामसलत करून, शाळा त्यांच्या गरजा आणि संसाधनांना लक्षात घेऊन स्वत: च्या योजना बनवू शकतात.

–   आता शाळांनाही समर्थनाची गरज भासेल, त्याचप्रमाणे मुलांप्रमाणेच, शिक्षण जगाशी संबंधित सर्व लोक आणि शाळांना देखील शिकण्याची आणि जबाबदार होण्याची आवश्यकता आहे.