Hrishikesh Deshmukh | हृषीकेश देशमुखांचा आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग; ED चे PMLA कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Hrishikesh Deshmukh | राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींचा खंडणीचा आरोप आहे. या प्रकरणावरुन देशमुख हे सध्या अटकेत आहेत. दरम्यान, ‘अनिल देशमुख यांचा मुलगा हृषीकेश देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्रिय होते. तर, बेकायदेशीररित्या मिळालेले पैसे देणगी स्वरुपात दाखवण्यासाठी हृषीकेश यांनी त्यांच्या वडिलांना मदत केली,’ असं म्हणत ईडीने (ED) हृषीकेश देशमुख (Hrishikesh Deshmukh) यांच्या अटकपूर्व जामीन (Pre-arrest bail) अर्जाला विरोध केला आहे.

 

सक्तवसुली संचालनालयाने (ED) पीएमएलए कोर्टात (PMLA Court) दाखल प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, ‘हृषीकेश देशमुख (Hrishikesh Deshmukh) यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला तर ते पुराव्यांची छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येणार नाही, तर देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांचे 11 कंपन्यांवर नियंत्रण असल्याचे प्राथमिक तपासातून उघडकीस आलेय. त्यातील बहुसंख्य कंपन्यांत हृषीकेश (Hrishikesh Deshmukh) हे संचालक किंवा भागधारक आहेत. हृषीकेश यांच्या वडिलांनी सचिन वाझेच्या (Sachin Waze) माध्यमातून (Suspended Police Officer) बार व रेस्टाॅरंट्सकडून वसुली केलेल्या 4.70 कोटी रुपयांतील काही पैसे हवालाद्वारे त्यांच्या सहकाऱ्याकडे वळते केले आणि तेच पैसे ट्रस्टला देण्यात आलेली देणगी म्हणून दाखविण्यात आले.

दरम्यान, न्यायालयाने हृषीकेश देशमुख (Hrishikesh Deshmukh) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 4 डिसेंबर रोजी ठेवली आहे.
दरम्यान, ‘हृषीकेश देशमुख यांनी कुटुंबीयांबरोबर मिळून ‘कॉम्प्लेक्स वेब’ अशी कंपनी स्थापली आणि याच कंपनीच्या खात्यावरून संशयित व्यवहार करण्यात आलाय.
6 वेळा समन्स बजावूनही हृषीकेश तपासाला सहकार्य करत नाही, असं देखील ईडीनं (ED) म्हटलं आहे.
तसेच, हृषीकेश देशमुख यांनी ईडी चुकीच्या हेतूने कारवाई करत असल्याचे आपल्या अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे.

 

Web Title :- Hrishikesh Deshmukh | former home minister anil deshmukh son hrishikesh deshmukhs active involvement financial malpractice eds affidavit special court pmla court mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sanjeeda Shaikh | संजीदा शेखच्या बोल्ड लूकनं वाढवला सोशलचा भलताच ‘पारा’ ! एकानं कमेंट्समध्ये चक्क विचारलं – ‘तुम्ही अंतरवस्त्र विसरलात का?’

Solapur Crime | धक्कादायक ! मोबाईलवरील अश्लील व्हिडीओपाहून चेकाळलेल्या पतीनं धरला वेगळाच ‘हट्ट’, पत्नीनं घेतली पोलिसांत धाव

Pune Crime | वाळु व्यावसायिक संतोष जगताप खुन प्रकरण ! महादेव आदलिंगे टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

Pune Crime | पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍याला 5 लाखाच्या खंडणीची मागणी; 4 लाख घेताना तिघांना खंडणी विरोधी पथकानं पकडलं