19 वर्षाच्या विद्यार्थ्याला मिळाली 2.5 कोटींची शिष्यवृत्ती, 4 वर्षे अमेरिकेत राहणार हृतिक राज

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – हृतिक राज या 19 वर्षीय विद्यार्थ्याने असे आश्चर्यकारक काम केले आहे की, ज्याचा सर्वांना अभिमान वाटू लागला आहे. आपल्या अभ्यासामधील उत्सुकता पाहून अमेरिकेच्या एका विद्यापीठाने राज याला अडीच कोटींची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.

हृतिक राजने जगात भारताचे नाव रोशन केले आहे. अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसीच्या जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीने ही शिष्यवृत्ती दिली आहे. पटना येथील रहिवासी हृतिक राज हा रेडियंट स्कूलचा 12 वीचा विद्यार्थी आहे आणि त्याला जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी, वॉशिंग्टन डीसी यांनी अडीच कोटींची शिष्यवृत्ती दिली आहे. ज्याचे नाव आरुप शिष्यवृत्ती आहे.

वॉशिंग्टन डीसीच्या जॉर्ज टाउन युनिव्हर्सिटी हृतिकचे 4 वर्षे शिक्षण आणि राहण्याचा संपूर्ण खर्च उचलणार आहे. एका वृत्तसंस्थेत झालेल्या चर्चेत हृतिक आणि त्याच्या वडिलांनी या टप्प्यावर पोहोचण्याच्या संघर्षाची कहाणी सांगितली आहे.