Video : … म्हणून ‘ऋतिक-टायगर’चा ‘वॉर’ २०१९ मधील सर्वात मोठा सिनेमा, टीजरमध्ये जबरदस्त ‘अ‍ॅक्शन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या मचअवेटेड वॉर या सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या टायटल बाबत दीर्घकाळापासून सस्पेंस ठेवण्यात आला होता. परंतु मेकर्सने मात्र आता ऑफिशियली टायटल, पहिले पोस्टर आणि टीजर रिलीज केला आहे. यशराज फिल्मच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेला आणि अॅक्शनने खचाखच भरलेला हा सिनेमा २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘२०१९ चा सर्वात मोठा ओपनर सिनेमा ठरू शकतो वॉर’

ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्शने या सिनेमाच्या रिलीज डेटशी निगडीत माहिती शेअर केली आहे. यात म्हटले आहे की, ‘हॉलिडेला रिलीज होत असलेल्या टायगर श्रॉफ आणि ऋतिकच्या या सिनेमाला ५ दिवसांचा एक्सटेंडेट वीकेंड मिळणार आहे. वॉर या वर्षातील बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठा ओपनर ठरू शकतो.’ या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. आदित्य चोपडा हा सिनेमा प्रोड्युस केला असून 3 भाषेत (हिंदी, तामिळ आणि तेलगू) हा सिनेमा रिलीज होणार आहे.

कसा आहे ‘वॉर’चा टीजर ?

बॉलिवूडमधील २ सुपरस्टार ऋतिक आणि टायगर पहिल्यांदाच सिनेमात एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमधील एक्साईटमेंट दुप्पट झाली आहे. ५३ सेकंदाच्या टीजरची प्रत्येक फ्रेम जबरदस्त आहे. टीजरमध्येच टायगर आणि ऋतिक यांच्या वॉर पहायला मिळत आहे. पॉवरफुल अॅक्शन सीन्स, खतरनाक स्टंट, फाईट सीक्वेंस, सुंदर लोकेशन यांनी भरलेला टीजर प्रेक्षकांची उत्सुका वाढवताना दिसत आहे. या सिनेमात टायगर आणि ऋतिक यांच्याव्यतिरीक्त वाणी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like