7 देश, 15 शहरं, 4 अ‍ॅक्शन डायरेक्टर, 3 भाषा, एवढा मोठा सिनेमा आहे ऋतिक रोशनचा ‘वॉर’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन  – ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे बॉलिवूडमधील ऍक्शन सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. जर हे दोघे एका सिनेमात आले तर प्रेक्षकांसाठी ती मेजवानीच असेल. मात्र दोघांच्या चाहत्यांचे हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार असून दोघांचा सिनेमा ‘वॉर’चे चित्रीकरण पूर्ण झाले असून आज त्याचा ट्रेलर रिलीज होणार आहे. 2 ऑकटोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून दोघांचेही चाहते या सिनेमाची वाट पाहत आहेत.

सिद्धार्थ आनंद याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा सिनेमा तीन भाषांत प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार असून  हा सिनेमा मोठ्या प्रमाणात परदेशात चित्रित करण्यात आला आहे. 7 देशांतील विविध 15 शहरांत हा सिनेमा चित्रित करण्यात आला असून या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात फायटिंग सीन पाहायला मिळणार आहे. यासाठी 4 ऍक्शन डायरेक्टर्स वापरण्यात आले आहेत. समीक्षकांनी व्यक्त केलेल्या मतानुसार वॉर बॉलीवुडमधील सर्वात मोठा ऍक्शन सिनेमा ठरणार आहे. वाणी कपूर हि सिनेमात मुख्य नायिका असून  ऋतिक आणि टायगरबरोबर सिनेमात तडका लावताना दिसून येणार आहे.

दरम्यान, हॉलिडे विकेंडवर हा सिनेमा प्रदर्शित होणार असून 5 दिवसांचा हॉलिडे विकेंड मिळणार असल्याने वर्षातील सर्वात जास्त ओपनिंग मिळणारा हा सिनेमा ठरण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –