‘फायटर’ मध्ये एकत्र दिसणार हृतिक रोशन-दीपिका पादुकोण, रिलीज झालं मोशन पोस्टर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  हृतिक रोशन,( hrithik roshan) दीपिका पादुकोण ( deepika padukone) आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी सर्व अफवांवर ब्रेक लावला आहे, कारण आज हृतिक रोशनच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ‘फायटर’ चित्रपटाशी संबंधित आपल्या सहयोगाची घोषणा केली आहे. हृतिक रोशनने आपल्या सोशल मीडियावर मोशन पोस्टरबरोबर ‘फायटर’ ची घोषणा केली आहे आणि सोबतच सिद्धार्थ आनंदच्या प्रॉडक्शन हाऊस ‘MARFLIX’ आणि दीपिका पादुकोणला सादर करत एक स्वीट नोट शेअर केली आहे.

हृतिक रोशनने शेअर केला मोशन पोस्टर

हृतिकने मोशन पोस्टर शेअर करत लिहिले आहे की, “MARFLIX व्हिजनच्या #Fighter ची झलक प्रस्तुत करतो. दीपिका पादुकोणबरोबरचा माझा हा पहिलाच चित्रपट असेल. मी या प्रवासासाठी पूर्णपणे तयार आहे #SiddharthAnand.” मोशन पोस्टरच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही हृतिकचा आवाज ऐकू शकता. तो म्हणतो, “दुनिया में मिल जाए आशिक कई, पर वतन से हसीन सनम नहीं होता. हीरों में सिमट कर, सोने से लिपट कर मरते हैं कई, पर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता.”

सिद्धार्थ आनंदसाठी हृतिकची भावनिक पोस्ट

याशिवाय हृतिकने दिग्दर्शक सिद्धार्थसाठी एक भावनिक नोट देखील शेअर केली आहे. ही नोट शेअर करताना हृतिकने लिहिले की, “एक अभिनेता म्हणून मी ममता आणि सिद्धार्थ आनंदच्या पहिल्या प्रॉडक्शन MARFLIX ला #Fighter सोबत परिचित केल्याने आणि चित्रपटाचा एक भाग झाल्याने मला खूप आनंद होत आहे. हे खूप खास आहे… कारण यामुळे एक दिग्दर्शक आणि मित्राशी माझे नाते आणखी घट्ट झाले आहे, ज्याचा प्रवास मी माझा सेट AD होण्यापासून, बँग बँग आणि वॉरमध्ये दिग्दर्शित करण्यापर्यंत पाहिला आहे. आणि आता जेव्हा तो फायटरचा निर्माता बनला आहे, तेव्हापासून माझ्या उत्सुकतेला मर्यादा राहिलेली नाही. हे माझ्या हृदयासाठी आणि मनासाठी एड्रेनालाईनसारखे आहे. धन्यवाद सिड, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला पुन्हा सह-प्रवासी बनविल्याबद्दल. आभाळाच्या दिशेने आपल्या प्रवासासाठी.”

दीपिका पादुकोणचे स्वप्न साकार झाले

या स्टाईलिश अ‍ॅक्शन चित्रपटासाठी सिद्धार्थ आनंदने हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण या दोन प्रतिभावान आणि सुंदर कलाकारांना पहिल्यांदाच कास्ट केले आहे. दीपिका पादुकोण या दिवसात बरेच चित्रपट साइन करत आहे आणि आता आणखी एक मोठा चित्रपट तिच्या किटीमध्ये सामील झाला आहे. दीपिकाने फायटरचे मोशन पोस्टरही शेअर केले आणि लिहिले की, “सपने सही में जरूर सच होते हैं.”

वॉर नंतर मोठ्या लीगचा खेळाडू बनला आहे सिद्धार्थ

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आपला पहिला चित्रपट वॉर नंतर एक वेगळ्या लीगमध्ये सामील झाला आहे. तसेच हृतिक रोशनचा ‘वॉर’ हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता आणि 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार्‍या काही चित्रपटांपैकी एक होता. सिद्धार्थ आनंदने म्हटले, “भारतीय आणि जागतिक प्रेक्षकांसाठी माझे आवडते स्टार हृतिक आणि दीपिकाला एकत्र आणणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक क्षण आहे. मी भारतात अ‍ॅक्शन फिल्म तयार करण्यासाठी समर्पित प्रॉडक्शन हाऊस मारफ्लिक्सचा प्रवास सुरू करण्यासाठी उत्सुक आहे. मी माझ्या जीवनसाथी ममता आनंदबरोबर मारफ्लिक्सचा प्रवास सुरू करीत आहे. हृतिकबरोबर मारफ्लिक्सची सुरुवात करणे विशेष आहे कारण त्याने मला AD म्हणून काम करताना पाहिले आहे, त्यानंतर दोन चित्रपटांत दिग्दर्शक म्हणून आणि आता मी फक्त त्याचा दिग्दर्शक नाही, तर मी त्याच्याबरोबर माझे प्रॉडक्शन हाऊससुद्धा सुरू करत आहे.”

तो पुढे म्हणतो, “मारफ्लिक्ससाठी आमची दृष्टी भारतात एक अ‍ॅक्शन फिल्म प्रॉडक्शन हाऊस बनवण्याची आहे. जर आपण भारतात अ‍ॅक्शन चित्रपटांबद्दल विचार केला तर आपल्या मनात मारफ्लिक्सचे नाव आलं पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करू. जरी हे प्रारंभिक दिवस असले तरी प्रवास सुरू झालेला आहे.”

या दिवशी रिलीज होईल फिल्म फायटर

फिल्म फायटरच्या रिलीजची तारीख 30 सप्टेंबर 2022 निश्चित केली आहे. या हाय ऑक्टेन अ‍ॅक्शन चित्रपटासाठी सुपरहिट जोडी हृतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंदला पुन्हा एकत्र पाहणे फार रोमांचक ठरणार आहे. हॉलिवूड चित्रपटाच्या xXx: Return of Xander Cage मध्ये कमालीची अ‍ॅक्शन दाखविल्यानंतर दीपिका पादुकोण पहिल्यांदाच बॉलिवूड अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.