हृतिक रोशनसह आठ व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल 

चेन्नई : वृत्तसंस्था

चेन्नईतील एका व्यापाऱ्याने बॉलिवूडचा अभिनेता हृतिक रोशनसह अन्य आठ लोकांविरोधात फसवणुकीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केली आहे. हे प्रकरण हृतिक रोशनच्या HRX या ब्रँडशी संबंधित आहे. याप्रकरणी हृतिक विरोधात कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर. मुरलीधरन नामक व्यक्तिने हा एफआयआर दाखल केली आहे.

[amazon_link asins=’B07FTVLFMX,B078T6WPDQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’51dd0cb8-ab4e-11e8-a67b-8f80af925ed7′]

मुरलीधरनने दिलेल्या माहितीनुसार, एका कंपनीने हृतिकच्या ब्रँडच्या प्रोडक्ट्सच्या विक्रीसाठी स्टॉकिस्ट म्हणून त्याची नियुक्ती केली होती. मात्र हृतिकच्या कंपनीच्या ब्रँडचे कोणतेही प्रोडक्ट्स पुरवले नाही आणि कोणतीही पूर्वसूचना न देता संपूर्ण मार्केटिंग टीम रद्द केली. अनियमित पुरवठ्यामुळे त्याला २१ लाख रूपयांचे नुकसान सोसावे लागले. हृतिक व अन्य आठ लोकांनी त्याला फसवले.

दारू पाजली नाही म्हणून मित्राचा खून करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी