ऋतिक रोशन ‘या’ अभिनेत्रीचा मोठा ‘फॅन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऋतिक रोशनने नुकतंच एक ट्विट केलं आहे. त्यात त्याने खुलासा केला आहे की, तो कोणाचा फॅन आहे. ऋतिकने ट्विटमधून सांगितले आहे की, तो अभिनेत्री शेफाली शाहचा खूप मोठा फॅन आहे. खरेतर शेफालीने सुपर ३० च्या ट्रेलरचं कौतुक करत ट्विट केलं होतं. तिने ऋतिकचं काम तिला आवडल्याचं सांगितलं होतं.

सुपर ३० सिनेमाच्या ट्रेलरचं कौतुक करत ऋतिकचं काम आपल्याला किती आवडलं हे सांगताना शेफाली आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, ” किती जिवंत ट्रेलर आहे हा ऋतिक तुझं काम खूपच आवडलं.”

शेफालीच्या ट्विटला रिप्लाय देताना ऋतिक ट्विटमध्ये म्हणतो की, “तुमच्या कामाचा मी खूप मोठा फॅन आहे.” ‘दिल्ली क्राईम’मध्ये शेफालीच्या अभिनयाची प्रशंसा करताना ऋतिक म्हणतो की, “दिल्ली क्राईम मध्ये अभूतपूर्व अभिनयासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि सिनेमाबद्दल तुम्ही इतकं सारं बोललात त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. तुमच्याकडून हा सिनेमा पाहिला जाईल याची प्रतिक्षा असेल.”

सुपर ३० या सिनेमात ऋतिकने गणित तज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा आनंद कुमार आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला प्रेरीत आहे. या सिनेमाचा ट्रेलर ४ जून रोजी रिलीज झाला होता. १२ जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सिनेजगत

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

 

You might also like