ऋतिक रोशनची आई पिंकी रोशन झाल्या ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, स्वतःला केलं क्वारंटाईन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची आई आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन यांची पत्नी पिंकी रोशन या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांनी स्वत: ला क्वारंटाइन करून घेतलं आहे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी सांगितले की, त्यांची पत्नी पिंकी रोशन यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्या आता उत्तम आहेत. सध्या त्या घरी आहेत. पिंकीला कोरोनाची कोणतीही सुरुवातीची चिन्हे नाहीत तरीही ती क्वारंटाइन आहे.

काही दिवसांपूर्वी राकेश रोशनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत पिंकीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि लिहिले आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा पिंकी. सदैव आनंदी रहा .. देवाचा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत

पिंकी रोशन यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून एक छान फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी आपल्या वाढदिवशी त्यांच्या कुटुंबीयांकडून खास व्यवस्थेचा उल्लेख केला आहे. पिंकीने हा फोटो शेअर केला आणि कॅम्पन लिहिली आहे. वाढदिवसाच्या दिवशी माझ्या घरच्यांनी माझ्या घराच्या दारात हे खास सरप्राईज दिले.

राकेश रोशन खुदगर्ज, खून भरी मांग, किशन कन्हैया, करण अर्जुन, कहो ना प्यार है, कोई मिल गया आणि क्रिश सीरीज सारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी त्यांना ओळखले जाते. ७० व ८० च्या दशकात त्यांनी चित्रपटात काम देखील केले आहे. त्यांचा मुलगा हृतिक रोशन हा देखील बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे.

ऋतिक रोशन क्रिश, धूम 2, जोधा अकबर, ज़िंदगी ना मिलेगी दोबारा, गुज़ारिश, अग्निपथ, काबिल, बैंग बैंग! सुपर ३० सारख्या बर्‍याच हिट चित्रपटांमध्ये त्याने आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयात खास स्थान मिळवले आहे. आता ब्लॉकबस्टर प्रसिद्ध चित्रपट वॉरमध्ये दिसला होता. या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत होते. सध्या हृतिक रोशनने आपल्या आगामी चित्रपटाविषयी कोणतीही नवीन घोषणा केलेली नाही.

You might also like