Video : कॅटरीनाच्या ‘चिकनी चमेली’ गाण्यावर हृतिक रोशनची फायटिंग ! व्हिडिओ पाहून अभिनेता म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) याचा एक व्हिडिओ सध्या सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हृतिकच्या चाहत्यांकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात अनेक अ‍ॅक्शन सीन आहेत तरीही हा व्हिडिओ मजेदार वाटत आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ काहीसा कॉमेडी नक्कीच वाटेल.

समोर आलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, काही सीनमध्ये तो क्रिश तर काही सीनमध्ये तो धूममधील आर्यन सिंहच्या अवतारात फायटिंग करताना आणि व्हिलन लोकांना पंच मारताना दिसत आहे. व्हिडिओची खास बात अशी की, या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला कॅटरीना कैफ (Katrina Kaif) हिचं चिकनी चमेली हे गाणं ऐकायला येत आहे. हा व्हिडिओ एडिट करत सिंक केलं गेलं होतं.

हृतिकचा हा व्हिडिओ सध्या सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हृतिकच्या अनेक चाहत्यांना त्याचा हा व्हिडिओ आवडला आहे. अनकेांनी कमेंट करत तशा प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. खास बात अशी खुद्द हृतिकनंदेखील याची दखल घेत यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. हृतिकनं लिहिलं की, हाहाहा नाईस. सध्या हृतिकच्या या व्हिडिओची सोशलवर खूप चर्चा सुरू आहे.

हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा वॉर या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत होता.