#Video : पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या ‘त्या’ ट्विटला हृतिक रोशनचा असा रिप्लाय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशनचा आगामी ‘सुपर 30’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा दोन मिनिटाचा ट्रेलर पाहून सगळ्यांनी ऋतिक रोशनच्या अभिनयाचे खूप कौतुक केले. या व्यतिरिक्त बॉलिवूड सिलेब्सने ही सोशल मिडियावर चित्रपट मेकर्स आणि ऋतिक रोशनचे कौतुक केले.

या ट्रेलरने पोलीसांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुणे पोलीसने ट्रेलरमध्ये एक डायलॉग (एवढे वाईट कसे असू शकते भाऊ) असे फोटोसोबत आपल्या ट्विटर हॅंडलवर शेअर केले आहे. या फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहले की, ‘जेव्हा आम्ही गाडीवर तीन लोकांना बसलेले पाहतो तेव्हा त्यांनी हेलमेटही घातलेले नसते. आणि ते गाडी चुकीच्या पद्धतीने चालवित असतात. ‘

पुणे पोलीसच्या या ट्विटने ऋतिक रोशनसोबतच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर ऋतिकने  ‘हा हा हा’ लिहून उत्तर दिले.

चित्रपटात ऋतिक रोशनने प्रसिद्ध गणित तज्ञ आनंद कुमारची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ऋतिकसोबत मृणाल ठाकुर, नंदीश सिंह, अमित साध, पंकज त्रिपाठी, विजय वर्मा यांची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे.