11 बोटांमुळं हृतिक अडचणीत, पियानो वाजवणं बनलं ‘कठीण’

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंदृ सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन केला आहे. लॉकडाउनमुळे घरात बसलेले कलाकार विविध प्रकारची कामे करुन वेळ घालवत आहेत. काही जण घराची साफ सफाई करत आहेत. तर काही जण व्यायाम वगैरे करताना दिसत आहेत. दरम्यान अभिनेता हृतिक रोशन चक्क पियानो शिकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याचा अतिरिक्त अंगठा त्याला पियानो वाजवूच देत नसल्याची तक्रार त्याने केली आहे.

हृतिक रोशनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पियानो वाजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. लहानपणापासून हृतिकला हे वाद्य शिकण्याची इच्छा होती. परंतु वेळेअभावी त्याला ते शक्य झाले नाही. सध्या लॉकडाउनच्या निमित्ताने त्याच्याकडे पुरेसा वेळ आहे. मात्र यावेळी त्याचा अतिरिक्त अंगठा त्याला पियानो वाजवण्यापासून रोखत आहे. थोडक्यात काय तर 10 ऐवजी 11 बोटे असल्यामुळे पियानो वाजवताना त्याला अडथळे येत आहेत. अशी गंमतीशीर तक्रार हृतिकने या व्हिडिओमध्ये केली आहे.