‘या’ चित्रपटात दीपिका आणि ऋतिक रोशन पहिल्यांदाच ‘एकत्र’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशन सध्या चित्रपट ‘सुपर ३०’ मुळे खुप चर्चेमध्ये आहे. हा चित्रपट १२ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासोबतच सध्या ऋतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या नावाची खूप चर्चा आहे. दोघेही एकत्र लवकरच चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार, अभिनेत्री दीपिका पादुकोण, अभिनेता ऋतिक रोशन व फराह खान लवकरच आगामी चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट ‘सत्ते पे सत्ता’ चा रिमेक आहे. ‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकचे प्रोडक्शन रोहित शेट्टी करत आहे. या चित्रपटासाठी अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार यांचे नाव समोर आले होते पण फायनल लिस्टमध्ये ऋतिक रोशनचे नाव समोर आले आहे.

https://www.instagram.com/p/Bx7IbVAgait/

https://www.instagram.com/p/Bxh15jfgmvo/

फराह खान आणि रोहित शेट्टी या दोघांनाही चित्रपटासाठी दीपिका पादुकोणला कास्ट करायचे आहे कारण, अभिनेत्री दीपिका पादुकोण ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटातील हेमा मालिनीची भूमिका चांगली साकारेल. दुसरे कारण हे आहे की, हेमामालिनीचे सौंदर्य दीपिकाच्या माध्यमातून पडद्यावर दाखविणे सोपे पडणार आहे. जर दीपिका या चित्रपटासाठी फायनल झाली तर तिच्या चाहत्यांसाठी एक सरप्राईज असेल. कारण पहिल्यांदाच दीपिका आणि ऋतिकची जोडी पडद्यावर दिसणार आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या रणवीर सिंगसोबत चित्रपट ‘८३’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासोबतच दीपिका चित्रपट ‘छपाक’ मध्ये दिसणार आहे. ऋतिक रोशन चित्रपट ‘सुपर ३०’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे. यानंतर ऋतिक रोशन आणि अभिनेता टायगर श्रॉफ ‘अॅक्शन’ चित्रपटात दिसून येणार आहे.

 

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?