टायगर श्रॉफ अन् शाहिदला ‘धोबीपछाड’ देत ‘हा’ बॉलिवूड स्टार बनला सेक्सी नं. 1 !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात झालेल्या एका सर्व्हेत गेल्या एका दशकातील आशियातील सेक्सिएस्ट मॅन कोण आहे याचा खुलासा झाला आहे. बॉलिवूड स्टार हृतिक रोशनला 2019 सोबतच या दशकाचा सेक्सी एशयाई पुरष म्हणून निवडण्यात आलं आहे. हृतिकनं याआधी ग्रीक गॉडचाही किताब मिळाला आहे.

ब्रिटीश विकली न्यूजपेपर ईस्टर्न आयनं वार्षिक सेक्सिएस्ट एशियन मेलचा सर्व्हे जाहीर केला होता. यात हृतिक रोशन टॉपवर आहे. त्याची निवड जगाताली सिनेमाच्या चाहत्यांची मतं, सोशल नेटवर्किंग साईटवरील चर्चा आणि त्यांच्या व्यापक प्रभावाच्या आधारावर करण्यात आली आहे. हृतिकनं दुहेरी यश संपादन केलं आहे. कारण त्याला गेल्या 10 वर्षातील जाहीर करण्यात आलेल्या एकूण क्रमावारीतही प्रथम स्थान मिळालं आहे. आशियाचा सेक्सिएस्ट मॅनचा दर्जा मिळाल्यानंतर हृतिक म्हणाला, “मी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो. ज्यांनी मला वोट दिलं आहे त्यांचे मी आभार मानतो.”

शाहिद कपूर, टायगर श्रॉफ आणि कोहली ‘या’ स्थानावर

या यादीत बॉलिवूड स्टार आणि 2017 चा विजेता शाहिद कपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीव्ही अ‍ॅक्टर विवियन डिसेना रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर तर अ‍ॅक्शन हिरो टायगर श्रॉफ चौथ्या स्थानावर आहे. ब्रिटीश आशियाई पॉपस्टार जाइन मलिक पाचव्या स्थानावर आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.