एकमेकांपासून विभक्त होऊन देखील सुझान म्हणते, आजही हृतिक माझा आधार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानची जोडी प्रसिद्ध होती. दोघांची केमिस्ट्री चांगली असून ही हे जोडपे २०१६ मध्ये एकमेकांपासून विभक्त झाले. १७ वर्षांचा हा संसार मोडून त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांचा हा निर्णय चाहत्यांसाठी धक्कादायक होता. त्यांनी एकमेकांवर कोणतेही आरोप न करता विभक्त झाले. मात्र, एकमेकांपासून विभक्त होण्याचे कारण अद्याप कोणाला कळू दिले नाही.

त्या दोघांच्या घटस्फोटानंतर ही हृतिकची एक्स पत्नी म्हणते की, ‘आजही हृतिक माझा आधार आहे. आम्ही पती-पत्नी नसलो तरी ‘ एकमेकांचे चांगले मित्रमैत्रिण आहोत. त्यामुळे मी स्वतः ला कधीच एकटे समजत नाही. सुझान मुलगा रेहान आणि रिदानच्या बाबतीत फार महत्वकांक्षी आहे. ती पुढे म्हणाली की, ”मला माझ्या मुलांपासून एक वेगळीच ताकद मिळते. ते जणू काही माझ्या उर्जेचा स्त्रोत आहे. आणि तेच मला आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देतात. एकल माता असणे आणि कामासोबत आईची भूमिका पार पाडणे ही एक तारेवरची कसरत आहे’ असे ती म्हणते.

ते दोघे एकमेकांपासून विभक्त जरी झाले असले तरी याचा परिणाम मुलांवर होऊ नये याची काळजी ते दोघे ही घेतात. सुझान आणि हृतिक मुलांसोबत सुट्ट्यांचा आनंद, त्याचबरोबर डिनरला जाण्यासाठी एकत्र येत असतात.