अभिनेता हृतिक रोशन पेक्षाही त्याची ६४ वर्षाची आई फिटनेस ‘सजग’ ; पहा फोटो, व्हिडिओ

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आपल्या फिटनेससाठी ओळखला जातो. फिटनेससाठी सजग मानल्या जाणाऱ्या अक्टर्समध्ये त्याचे नाव घेतले जाते. काहीही झाले तरी तो आपले जिममधील वर्कआउट कधीही चुकवत नाही. रोशन कुटुंबातील केवळ हृतिकच नाही तर आणखीही एक व्यक्ती फिटनेससंदर्भात वेडी आहे. हृतिकची आई पिंकी रोशन हीदेखील न चुकता रोज जिममध्ये जाऊन ठरलेले वर्कआउट पूर्ण करते.

हृतिकच्या आई सध्या वयाच्या ६४ व्या वर्षी सुध्दा जिममध्ये जाऊन कठोर मेहनत घेत असतात. वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंग असे व्यायामाचे वेगवेगळे प्रकार त्या करतात. खास भारतीय व्यायामपद्धती ‘योगा’ देखील त्या कटाक्षाने लक्ष देऊन करतात. या व्यायामप्रकारात देखील त्या प्रविण आहेत.

View this post on Instagram

India #hows the JOSH#

A post shared by Pinkie Roshan (@pinkieroshan) on

सोशल मीडियावर पिंकी रोशन मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह आहेत. ‘pinkieroshan’ या नावाने त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट असून जिममधील व्यायामाच्या व्हिडीओ आणि फोटोंनी ते खचाखच भरलेले आहे. या अकाउंट वर केवळ व्यायामाचे आणि जिम मधील ऍक्टिव्हिटीचेच फोटोस आणि व्हिडिओस आहेत. हे फोटोस सध्या चर्चेचा विषय असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

आपल्या आईच्या फिटनेसमुळे हृतिकही खूप प्रेरित आहे. मागे त्याने आपल्या एका मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केलेले होते.  माझी आई म्हणजे स्त्रीशक्तीचे एक जिवंत उदाहरण असून तिचा उत्साह नेहमी लहान मुलांसारखा असल्याचे त्याने म्हटले होते. ती नेहमीच सर्वांना प्रेरित करते, तशीच मलादेखील तिच्याकडून प्रेरणा मिळत असते असेदेखील त्याने म्हटले होते.

हृतिकच्या वडिलांचे आणि आईचे म्हणजेच राकेश रोशन आणि पिंकी यांचे लग्न १९७० साली झाले. राकेश रोशन यांचे वडील आणि पिंकी यांचे वडील डायरेक्टर ओमप्रकाश हे जवळचे मित्र होते. त्यातूनच त्यांची ओळख होऊन लग्न जुळले होते.

Loading...
You might also like