2019 मध्ये ‘या’ सिनेमाची सर्वाधिक कमाई, ‘भाईजान’ सलमानचा ‘भारत’ चौथ्या स्थानावर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या वॉर सिनेमाची धुवाधार कमाई सुरूच आहे. या सिनेमाने 3 आठवड्यात 300 कोटींचा आकडा पार केला आहे. या सोबतच हा सिनेमा 2019 मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. कमाईच्या बाबतीत या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. पहिल्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत तर या सिनेमाने बॉलिवूडमध्ये इतिहासच रचला आहे.

यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांची लिस्ट
1)
वॉर (300 कोटी पार)
2) कबीर सिंह (278 कोटी)
3) उरी : द सर्जिकल स्ट्राईक (245 कोटी)
4) भारत (216 कोटी)
5) मिशन मंगल (202 कोटी)

वॉरने आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 हिंदी सिनेमात एन्ट्री केली आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत पहिल्या क्रमांकावर बाहुबली (हिंदी व्हर्जन), दुसऱ्यावर दंगल, तिसऱ्यावर संजू, चौथ्यावर पीके, पाचव्या क्रमांकवार टाइगर जिंदा है, सहाव्यावर बजरंगी भाईजान, सातव्यावर पद्मावत, आठव्यावर सुल्तान, नवव्यावर धूम आणि दहाव्यावर वॉर सिनेमा आहे.

भारतात 4000 स्क्रीन्सवर रिलीज झालेल्या वॉर सिनेमाने पहिल्या दिवशी 53.35 कोटी कमावले. तीनच दिवसात या सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला होता. या सिनेमात अॅक्शनचा मोठा डोज पाहायला मिळतो. याशिवाय टायगर आणि हृतिकचा दमदार डान्सही पाहायला मिळतो.

या सिनेमात वाणी कपूरही प्रमुख भूमिकेत आहे. सिद्धार्थ आनंदने हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. वॉर 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने रिलीज झाला होता.

Visit : policenama.com

You might also like