Hruta Durgule | पोस्ट शेअर करत ऋता दुर्गुळेने केली मोठी घोषणा; म्हणाली “आजचा दिवस…”

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री ऋता दुर्गुळेला (Hruta Durgule) ‘फुलपाखरू’ या मालिकेतून जास्त प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती. ऋताने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. ऋता नेहमीच चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी ऋताचे (Hruta Durgule) नाव देखील आवर्जून घेतले जाते. ‘अनन्या’, ‘टाईमपास 3’ या दोन्ही चित्रपटांमध्ये ऋताने आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत. या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाची चर्चा आजही केली जाते. तर आता ऋताची एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

 

ऋताने शेअर केलेल्या पोस्ट मधून समजते की ती लवकरच एक मोठी घोषणा करणार आहे. ऋता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटो पेक्षा तिने फोटोला दिलेले कॅप्शन आणि हॅशटॅग सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. फोटो शेअर करत तिने म्हटले की, “आजचा दिवस फारच खास आहे”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. त्याबरोबर तिने #announcementsoon #happy #grateful #blessed #hrutadurgule, त्याचबरोबर तिने असे हे हॅशटॅग दिले आहे.

https://www.instagram.com/p/Co84ufSowYS/?utm_source=ig_web_copy_link

आता ऋताच्या चाहत्यांना मोठा प्रश्न पडला आहे की ऋताने (Hruta Durgule) अशा पद्धतीचे हॅशटॅग शेअर करत
ती लवकरच एखादी मोठी घोषणा करणार आहे तर तिची नेमकी घोषणा काय असणार आहे.
याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर अनेक चाहते याचा अंदाजही वर्तवत आहेत.
ऋताने आजवर अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम केले आहे.
ऋताने फुलपाखरू या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनन्या आणि टाइमपास 3 या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले.

 

Web Title :- Hruta Durgule | marathi actress hruta durgule will made special announcement soon share post

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Temperature | विदर्भात उन्हाळ्याची लागली चाहूल; जाणून घ्या बाकीच्या जिल्ह्यात काय आहे स्थिती ?

NCP Chief Sharad Pawar | ‘पहाटेच्या शपथविधीमुळे एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे…’ शरद पवारांचं मोठं विधान (व्हिडिओ)

Solapur Crime News | धक्कादायक! सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या