HSC 12th Result 2022 | बारावीचा निकाल जाहीर ! यंदाही कोकण विभागानं मारली बाजी; 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – HSC 12th Result 2022 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary And Higher Secondary Education) बारावी बोर्डाच्या निकालाची (HSC 12th Result 2022) उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना होती. त्याला आज पूर्णविराम मिळाला आहे. आज बारावीचा यंदाच्या वर्षीचा निकाल जारी करण्यात आला आहे. राज्यातील निकालापैकी कोकण विभागाने (Konkan Division) बाजी मारली आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12 वीचा निकाल (HSC 12th Result 20220) जाहीर करण्यात आला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 94.22 टक्के इतका लागला असून मुंबई विभागाचा (Mumbai Division) निकाल सर्वात कमी लागला आहे. आज दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल (Online Results) पाहता येणार आहे.

 

राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर करण्यात आला. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी राज्यातील बारावीच्या निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. बरेच चढउतार असतानाही विद्यार्थ्यांनी परीक्षेचा हा टप्पा मोठ्या संयमानं ओलांडला याबाबत शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.

विभागवार निकाल पाहा –

कोकण विभाग – 97.21 टक्के

नागपूर – 96.52 टक्के

अमरावती – 96.34 टक्के

= लातूर – 95.25 टक्के

कोल्हापूर – 95.07 टक्के

नाशिक – 95.03 टक्के

औरंगाबाद – 94.97 टक्के

पुणे – 93.61 टक्के

मुंबई – 90.91 टक्के

 

पुढील संकेतस्थळांवर बारावीचा ऑनलाइन निकाल पाहता येणार –

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

http://hsc.mahresults.org.in

 

Web Title :- HSC 12th Result 2022 | HSC 12th Result 2022 percentage of result in maharashtra is 94 point 22 konkan division number one again

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune MHADA Online Registration | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! म्हाडाकडून 5 हजार घरांची सोडत; ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ गुरुवारी होणार

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Sandeep Deshpande On Uddhav Thackeray | ‘राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे एमआयएम-समाजवादीच्या दाढ्या कुरवाळतायत’; मनसेचा घणाघात