१२ वी च्या निकालासंदर्भात महत्वाची बातमी ; निकालाची तारीख जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या २८ मे रोजी दुपारी १ वाजता लागणार आहे. याबाबतची माहिती शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे.

यंदा आयसीएसई आणि सीबीएसई या मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लवकर जाहीर झाले आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान घेण्यात आली होती. यंदा राज्यातल्या नऊ विभागातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. मागील दोन वर्ष बोर्डाकडून ३० मे रोजी ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे.

येथे पहा निकाल-

बारावीचा निकाल mahresult.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

Loading...
You might also like