12 वीची परीक्षा होणारच, मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र 12 वीच्या परीक्षा होणारच असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. दरम्यान (दि. 21) रात्री 8 वाजता मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री कडक लॉकडाऊनची घोषणा करण्याची शक्यता आहे.

आज मंगळवारी (दि. 20) मंत्रीमंडळाची बैठक झाली असून यात 10 वीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही ट्विट करून 10 वीच्या परीक्षा रद्द झाल्याचे सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून विद्यार्थी, शिक्षक यांचे आरोग्य आमच्यासाठी पहिले प्राधान्य असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

1) राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन करणार, उद्या मुख्यमंत्री करणार घोषणा

2) 10 वीच्या परीक्षा रद्द, परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करणार

3) 12 वी ची परीक्षा होणारच – राजेश टोपे

4) कोरोनाची भीषण परिस्थिती निर्माण झाली – एकनाथ शिंदे

5) नियमावली लवकरच जाहीर केली जाईल – अस्लम शेख

6) राज्यात जिल्हाबंदी होणार, प्रवासावर निर्बंध येणार

7)परदेशी लस लसीकरणासाठी वापरणार

8) लसीकरणाचा वेग वाढविण्याची केंद्राकडे मागणी

9) अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासाची मुभा मिळणार