12th Result : राज्याचा निकाल ८५.८८ टक्के ; यंदाही मुलींनीच मारली बाजी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १२ परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल ८५. ८८ टक्के इतका लागला आहे. आज सकाळी ११ वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा निकालात २. ५३ टक्क्यांची घट झाली आहे. याबाबत बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी माहिती दिली.

मुंबई, पुणे, नागपूर, कोकण, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, औरंगाबाद या नऊ विभागाच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी हि परीक्षा दिली होती. यात ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी व ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थीनी होत्या.

यंदाही मुलींची बाजी

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. ९०. २५ टक्के इतक्या विद्यार्थिनी तर ८२. ४० टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यात कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त म्हणजेच ९३. २३ तर नागपूर विभागाचा सर्वात कमी म्हणजे ८२. ८१ टक्के इतका लागला आहे.

विविध शाखांनुसार निकाल

विज्ञान शाखा निकाल :९२. ६० टक्के

कला शाखा निकाल :७६. ४५ टक्के

वाणिज्य शाखा निकाल :८८. २८ टक्के

विभागवार निकाल

पुणे – ८७. ८८ टक्के
मुंबई – ८३. ८५ टक्के
नागपूर – ८२. ८१ टक्के
अमरावती – ८७ टक्के
लातूर – ८६. ०८ टक्के
नाशिक – ८४. ७७ टक्के
औरंगाबाद – ८७. २९ टक्के
कोल्हापूर – ८७. १२ टक्के
कोकण – ९३. २३ टक्के

येथे पहा निकाल

महाराष्ट्र्र बोर्डाच्या या संकेतस्थळावर तुम्ही निकाल पाहू शकता

www.maharesult.nic.in