HSC Paper Leak Case | बारावी पेपर फुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – HSC Paper Leak Case | बारावीच्या गणिताच्या पेपर (12th Maths Paper) फुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलढाण्यात पेपर फुटीसाठी व्हॉट्सॲपचा (WhatsApp) वापर करण्यात आला होता. व्हॉट्सॲप ग्रुप बनवून कॉपी केली. या प्रकरणात (HSC Paper Leak Case) दोन शिक्षकांसह (Teacher) पाच जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. याशिवाय परीक्षेस पास करुन देण्यासाठी विद्यार्थ्यंकडून प्रत्येकी 10 ते 12 हजार रुपये घेतले जात असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

शिक्षक, विद्यार्थी, पालकांसह विविध क्षेत्रातील लोक सहभागी

पेपर फुटी प्रकरणाचा (HSC Paper Leak Case) तपास सुरु आहे. व्हॉट्सॲप ग्रुप बनवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पेपर कॉपी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये 99 जण असून यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्ती सहभागी असल्याचे समोर आले आहे. पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हा ग्रुप डिलीट करण्यात आला. यासंदर्भात सायबर पोलिसांकडून (Cyber Police) अधिक तपास केला जात असून डिलीट करण्यात आलेला सर्व डेटा लवकरात लवकर रिकव्हर केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पेपरफुटीमागे मुंबई कनेक्शन

पेपरफुटीमागे मुंबईतील विद्यार्थी असल्याचे समोर आले.
मुंबईतील विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गणिताच्या पेपरचे काही भाग आढळून आले आहेत.
डॉ. अँथोनी डिसिल्वा हायस्कूलमधील (Anthony D’Silva High School) परीक्षार्थींच्या मोबाईलमधील
दहा वाजून 17 मिनिटांनी गणिताचा पेपर सापडला.
याप्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा (FIR)दाखल केला आहे.
या प्रकरणचा तपास क्राईम ब्रँचकडे (Crime Branch) वर्ग करण्यात आला आहे.

Web Title :-  HSC Paper Leak Case | hsc exam 2023 paper leak case use of whatsapp group for copy by making five arrested with two teachers buldhana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मित्राच्या मदतीने शारीरीक संबंधाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची दिली धमकी

Yavatmal Crime News | पाणी काढायला सांगून पत्नीला विहिरीत ढकलून केला खून

Beed Crime News | दहावीची परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

Pune Crime News | भाडेकरुने बनावट दस्त तयार करुन फ्लॅट बळकाविण्याचा केला प्रयत्न; वकीलासह तिघांवर गुन्हा दाखल