बारावी फेरपरीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर 

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १२ वीच्या फेरपरीक्षेचा निकालाची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी (२४ ऑगस्ट) दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील. तसेच या निकालाची प्रिंटआऊटही घेता येईल. प्रत्यक्ष निकालाची प्रत हाती कधी मिळेल याबाबत मात्र अद्याप सांगण्यात आले नाही. १७ जुलै ते ४ ऑगस्ट या दरम्यान १२ वीची फेरपरीक्षा घेण्यात आली होती. फेब्रुवारी- मार्च २०१८ मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमध्ये सुमारे दोन हजार ८२२ परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.

एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गेल्यावर्षी जुलैमध्ये बारावीच्या फेरपरीक्षा पार पडल्या होत्या. यावेळी इतर आठ विभागाच्या तुलनेत औरंगाबाद विभागाने निकालात आघाडी घेतली होती. या भागातून परीक्षा दिलेल्यांपैकी ३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते त्यातही मुलींचा सहभाग अधिक होता. मार्च २०१७ मध्ये १० हजार ८९८ विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षा दिली होती. मुलांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी लवकर पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
[amazon_link asins=’B01LXDUDDQ,B0002E3MP4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bf8d2c4e-a6e2-11e8-9939-09cfae0ca64d’]