HSC Result 2023 | आझम कॅम्पस च्या शाळांचे १२ वी च्या परिक्षेत घवघवीत यश!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – HSC Result 2023 | महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (Maharashtra Cosmopolitan Education Society) ‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल अँड आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स’ (Anglo Urdu Girls High School and Abeda Inamdar Junior College for Girls), अँग्लो उर्दू बॉईज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (Anglo Urdu Boys School & Junior College), एम. सी. इ. एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या (M. C. etc. S. English Medium School and Junior College) विद्यार्थ्यांनी बारावी परिक्षेत यश मिळवले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी ए इनामदार (Dr. P. A. Inamdar), उपाध्यक्ष अबेदा इनामदार (Abeda Inamdar), सचिव प्रा. इरफान शेख (Prof. Irfan Shaikh), मुख्याध्यापक शिरीन खान (Principal Shireen Khan), मुख्याध्यापक रोशन आरा (Principal Roshan Ara), मुख्याध्यापक राज मुजावर (Principal Raj Mujawar) यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. (HSC Result 2023)

अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल अँड ज्युनियर कॉलेजचा निकाल ८८.२० टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल ८७.५० टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल ६२.२६ टक्के,तर वाणिज्य शाखेचा निकाल ९३ टक्के इतका लागला. विज्ञान शाखेतून ९१.६७ टक्के गुण मिळवून जैन जान्हवी प्रवीण प्रथम आली . कला विभागात अडसुरे अर्थम रवींद्र ८८.३३ टक्के गुण मिळवून प्रथम आला तर कॉमर्स विभागात अंतुले मारुफ असिफ ८४.१७ टक्के गुण मिळवून प्रथम आला.

‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल अँड आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स ‘चा एकूण निकाल ९६.२० टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल ८७.९० टक्के, वाणिज्य शाखेचा ९६.११ टक्के तर कला शाखेचा ८८.६० टक्के निकाल लागला. मुलाणी मेहविश अयुबखान ही ८१.५० टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आली. कॉमर्स विभागात सय्यद लायेबा शरीफ ९४.१७ टक्के मिळवून प्रथम आली तर शेख आयेशा महमद रफिक ९०.८३ टक्के गुण मिळवून कला शाखेत प्रथम आली. (HSC Result 2023)

 

 

‘एम.सी.इ.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज’ चा निकाल ९३.९३ टक्के लागला.
विज्ञान शाखेचा निकाल ९४.७७ टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल ८० टक्के,
तर वाणिज्य शाखेचा निकाल ९७.९० टक्के इतका लागला.
शेख आयेशा अफरोज ७९.५० टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आली.
कॉमर्स विभागात चव्हाण ख़ुशी राकेश ७९.३३ टक्के मिळवून प्रथम आली
तर घडियाली सारा जफर ८६.७० टक्के गुण मिळवून कला शाखेत प्रथम आली.

 

Web Title :  HSC Result 2023 | Azam Campus schools have great success in the 12th exam!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा