HSC – SSC Exam 2023 | दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – HSC – SSC Exam 2023 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board) फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे (HSC – SSC Exam 2023) संभाव्य वेळापत्रक (Exam Schedule) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा 2 मार्च पासून सुरु होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी (दि.19) परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली.

 

फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी शालान्त प्रमाणपत्र लेखी परीक्षा (HSC – SSC Exam 2023) संभाव्य कालाधित आयोजीत करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक (State Board Secretary Anuradha Oak) यांनी दिली.

 

शाळा व कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, या हेतूने,
तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील ताण कमी होण्याच्या दृष्टीने संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असून, विद्यार्थ्यांनी याच वेळापत्रकाचा आधार घ्यावा.
सोशल मीडियावर प्रसिद्ध होणारे वेळापत्रक ग्राह्य धरु नये.
प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा व अन्य परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळा व महाविद्यालयांना कळवले जाईल,
असे मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.

 

बारावी परीक्षेचा कालावधी – 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023

दहावीच्या परीक्षेचा कालावधी – 2 मार्च ते 25 मार्च 2023

https://mahahsc.in/notification/TIMETABLEHSMAR23CIR.pdf

 

Web Title :- HSC – SSC Exam 2023 | ssc-hse exams 2023 exam shedule 10th 12th exam schedule announced check here in details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pumpkin Seeds | टाकाऊ समजून डस्टबिनमध्ये टाकू नका भोपळ्याच्या बिया, अन्यथा मिळणार नाहीत फायदे

Diabetes आणि Heart च्या पेशंटने करावे ‘या’ पाण्यातील वनस्पतीचे सेवन, आरोग्याचे टेन्शन होईल दूर

Jayant Patil | शिंदे-फडणवीस सरकारबाबत जयंत पाटलांचे मोठं भाकित, म्हणाले – ‘याच’ दिवशी सरकार बरखास्त होईल’