2 वर्षांनंतर अभिनेता फरहान अख्तरचं घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच वक्तव्य !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना यांचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर फरहानने घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. फरहान सध्या मुव्ह ऑन झाला असून खूप खुश आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून त्याने यावर मौन पाळले होते. काही दिवसांपासून त्याच्या आणि शिबानी दांडेकरच्या नात्याची चर्चा सुरु आहेत. त्यांच्या फोटोंवरूनच त्यांच्या नात्याची साक्ष मिळते.

नुकतीच त्याने द स्काय इज पिंक या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने एक मुलाखत दिली. यावेळी त्याला विचारण्यात आले मुलांना घटस्फोटाबाबत सांगणं किती अवघड होतं ? फरहान म्हणाला, “काहीच सोपं नाही. आपल्या मुलांना ती प्रत्येक गोष्ट सांगणं जी त्यांना ऐकायची नसते ते सोपं नाही. तुम्हाला याची जाणीव होते की, तुम्ही त्यांच्याकडू कोणत्या गोष्टींची अपेक्षा ठेवता.”

पुढे फरहान म्हणाला, “आपण आपल्या मुलांना जसं समजतो ते त्याहून समजदार असतात. तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलता आणि समजता सर्व ठिक आहे. मी त्यांना सगळं काही खरं खरं सांगितलं आहे. आता ते हवं ते करू शकतात.”

फरहान म्हणाला, “मुलांना कळून जातं की तुम्ही जे केलं आहे ते का केलं आहे. कदाचित ते लगेच समजूनही घेणार नाहीत. परंतु तुम्ही त्यांचा प्रति इमानदार असायला हवं. तेही तुमच्याशी रोज इमानदारीनंच वागतील.”

फरहानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर सध्या तो आगामी सिनेमा तूफान च्या तयारीत आहे. या सिनेमात तो बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

Sunshine and smiles. @shibanidandekar ❤️

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

Visit : Policenama.com

 

You might also like