रक्तदाब आहे…? ‘हे’ योगासन करा

पोलिसनामा ऑनलाईन टीम- अशी काही साधी आणि परिणामकारक योगासने आहेत जी केल्याने कमी रक्तदाबाची समस्या दूर होऊ शकते. ही योगासने नियमित केल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात. यापैकीच एक ‘चलित ताडासन’ आहे. हे आसन करताना दोन्ही पायांच्या टाचा आणि पंजे जोडत सरळ सावधानच्या स्थितीत उभे राहा. श्वास घेत दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या वर ताठ करा. नंतर हळूच पंजावर या. आता शरीराला पूर्णपणे वरच्या दिशेने ताण देत गुडघे न वाकवता ३० सेकंद ते १ मिनिटे चाला. हे आसन २ ते ३ वेळा करू शकता.

‘चलित ताडासन’ केल्याने संपूर्ण शरीर चांगल्या प्रकारे ताणले जाते. पायांना बळ मिळते. मेरुदंड लवचिक होतो. पाठीच्या कण्याच्या वेदना दूर होतात. हाडे बळकट होतात. मात्र, हे आसन करताना चक्कर आल्यासारखे वाटत असेल तर करू नये. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांचा रक्तदाब सामान्यापेक्षा कमी असतो, त्यांनी उन्हाळ्यात जास्त मेहनतीची योगासने करू नयेत. अशा योगासनांमुळे उन्हाळ्यात जास्त घाम येतो आणि कमी रक्तदाबाच्या रुग्णाचा रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो.