दिवसभर एसीमध्ये बसून ‘ही’ समस्या उदभवू शकते

पोलिसनामा ऑनलाईन टीम- आपण ऑफिस, घरी, कारमध्ये नेहमी एसी लावून वावरत असाल तर जरा थांबा. दिवसभर एसी मध्ये बसून तुम्हाला उन्हापासून संरक्षण नक्कीच मिळेल. पण कायम एसीत राहण्याचे काही धोके सुद्धा आहेत. त्यामुळे काही काळ आपण सामान्य तापमानात राहिले पाहिजे. ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील.

याबाबत अलबामा युनिव्हर्सिटीत एक संशोधन करण्यात आले. या संशोधनात असे आढळून आले की एअर कंडिशनरच्या वापरामुळे लठ्ठपणा वाढतो. गारवा असलेल्या ठिकाणी शरीरातील ऊर्जा खर्च होत नसल्याने शरीरातील चरबी वाढते. यासाठी एकाच जागेवर जास्त वेळ बसू नये. लो फॅटचा आहार घ्यावा. एअर कंडिशनचा फिल्टर अस्वच्छ असेल तर दम्याचा त्रासही होऊ शकतो. तसेच घशात खवखव आणि सर्दी-खोकल्याची समस्या होऊ लागते. कित्येक लोकांना सारखा खोकलाही होतो. यासाठी एअर कंडिशनरच्या फिल्टरची सर्विसिंग वेळच्यावेळी केली पाहिजे. गारव्याचा सरळ परिणाम शरीराच्या सांध्यांवर होऊन गुडघे, हात आणि मानेत दुखते आणि सांधे आखडतात. सतत याच अवस्थेत राहिल्यामुळे आर्थरायटिससारखा गंभीर आजारही होऊ शकतो. यासाठी एकाच जागी जास्त वेळ बसू नये.एकाच जागी बसल्याने दुखणे वाढू शकते.

सतत एअर कंडिशनमध्ये बसल्यामुळे स्नायूंवर ताण येतो आणि डोकेदुखीचा त्रास होतो. यामुळे स्नायूमधील दुखणे वाढण्याची शक्यता असते. वय वाढल्यानंतर ही समस्या गंभीर होऊ शकते. यासाठी एसीचे तापमान खूप कमी ठेवू नये. एअर कंडिशनरमध्ये राहिल्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो तसेच डोळ्यात पाणी, जळजळ आणि खाजदेखील होते. अशावेळी दिवसभरात जास्तीत जास्त वेळा डोळे धुवावे. पापण्यांची सारखी उघडझाप करावी. एसी सुरू असल्यास हवेतील आर्द्रता कमी होते आणि याचे दुष्परिणाम त्वचेवर दिसून येतात. यामुळे तुमच्या त्वचेची नैसर्गिक कोमलता संपवते आणि त्वचा कोरडी होते. ही समस्या टाळण्यासाठी पाणी जास्त प्यावे.