‘त्या’ प्रकरणी मुंबई पोलिसांनी ‘ब्लॉक’ केल्यानंतर अभिनेत्री पायलची HM शाहांकडे ‘तक्रार’, अमृता फडणवीसांचा पायलला पाठिंबा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉसची एक्स स्पर्धक आणि अॅक्ट्रेस पायल रोहतगीचा व्हिडीओ व्हायरल होणं ही काही नवीन बाब नाही. कधी ती आपल्या फेसबुक लाईव्हमुळे तर कधी आपल्या ट्विटमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी पायलने शबाना आझमींवर निशाणा साधला होता. नुकतंच मुंबई पोलिसांनी पायलवर कारवाई करत तिचा ट्विटर अकाऊंट ब्लॉक केलं होतं. परंतु वाद वाढल्याने आता ते अनब्लॉक करण्यात आलं आहे.

image.png
या गोष्टीमुळे नाराज पायल रोहतगीने मुंबई पोलिसांवर सवाल उपस्थित करत पक्षपाताचा आरोप केला आहे. तिने पोलिसांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली आहे. तिने याबाबत अमित शहांना मेल केला आहे.

image.png

पायलने ट्विटरवर मुंबई पोलिसांनी ब्लॉक केल्यानंतरचा स्क्रीन शॉट दाखवत विचारले आहे की, “मुंबई पोलिसांनी मला ब्लॉक का केले ? मुंबई पोलिसांच्या या पक्षपातानंतर मला हिंदुस्तानात राहायला भीती वाटत आहे.”

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1149221698006392832

पायलने अमित शहांना केलेल्या मेलमध्ये लिहिले आहे की, “आशा करते सर्व काही चांगलं होईल. तुम्हाला तसदी दिल्या बद्दल माफी मागते. परंतु आज सकाळी मला माझ्या ऑफिसकडून समजलं की, मुंबई पोलिसांनी माझं व्हेरीफाईड अकाऊंट ब्लॉक केलं आहे. एक प्रोफेशनल या नात्याने ते असं नाही करू शकत. हे खूप शॉकिंग आहे की, एका टॅक्स पेयर नागरिकासोबत असं झालं आहे.”

image.png

पायलने लिहिलं आहे की, “एजाज खान नावाच्या अॅक्टरने माझ्या विरुद्ध व्हिडीओत चुकीचे बोलले आहे. या सर्व गोष्टींना मी इग्नोर केले, परंतु आता मी आशा करते की, तुम्ही यावर लक्ष द्याल.” यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पायलला सपोर्ट केला आहे.

You might also like