‘XXX’, ‘गंदी बात’सह ‘बोल्ड’ सीन्स आणि वादग्रस्त कंटेटमुळं वादात सापडल्यात एकता कपूरच्या ‘या’ वेब सीरिज ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   एकता कपूर सध्या तिची वेब सीरिज xxx मुळं चर्चेत आहे. या सीरिजच्या काही सीन्समध्ये भारतीय सैन्याचा अपनमान केला असल्याचं बोललं जात आहे. परंतु एकताच्या प्रॉडक्शनमध्ये बनलेली वेब सीरिज वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अशाच तिच्या काही वेब शोजबद्दल जाणून घेऊयात ज्यावरून याआधीही वाद झाला आहे.

1) गंदी बात-  ही सीरिज लाँच केल्यानंतर खूप वाद झाला होता. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या ट्रेंडमध्ये आल्यानंतर या शोनं खूप अटेंशन घेतलं. शोमधील बोल्ड सीन्स मुर्खता पूर्ण आणि याचे पोस्टरही खूप अश्लील असल्याचं बोललं गेलं. असं असलं तरीही ही सीरिज खूप पाहिली गेली. याच्या सीजन 4 च्या ट्रेलरनं तर जबरदस्त व्ह्युअरशिप मिळवली होती. रिलीज होताच यानं राडा घातला होता.

2) xxx-  सध्या xxx या सीरिजवरून वाद सुरू आहे. यात महिला पतीसोबत प्रतारणा करताना दिसत आहे. वादग्रस्त सीनमध्ये महिला आर्मी युनिफॉर्म फाडताना दिसत आहे. अनेक आक्षेपार्ह सीन्सही आहेत. हिंदुस्तानी भाऊनं यासंदर्भात पोलिसात तक्रार केली आहे.

हिंदुस्तानी भाऊनं एकता कपूर आणि तिच्या आईनं माफी मागावी अशी मागणी केली आहे. सोबतच त्यानं एकताला मिळालेल्या पद्म श्री पुरस्कारावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानं पुरस्कार परत करण्याची मागणी केली आहे.

3) एम.ओ.एम.-  मिशन ओव्हर मार्स या सीरिजच्या पोस्टरवरूनही वाद झाला होता. असा आरोप होता की, वेब सीरिजच्या पोस्टरमध्ये चुकीचं स्पेस रॉकेट वापरण्यात आलं होतं जे रशिनय रॉकेट सोयुज प्रेक्षपण यान असल्याचं सांगितलं गेलं. यात तिरंगाही दाखवण्यात आला होता. यानंतर एकता खूप ट्रोल झाली होती. नंतर यावर स्पष्टीकरणही देण्यात आलं होतं की, हे प्रातनिधिक आहे कारण खऱ्या रॉकेटचं पोस्टर वापरणं शक्य नाही.

4) कोड एम-  जेनिफर विंगेटची सीरिज कोड एम हीदेखील खूप वादात सापडली होती. यातही सेनेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांची चुकीची प्रतिमा दाखवली गेली असं सांगण्यात आलं होतं. यात जेनिफरनं मेजरचा रोल केला होता. हा तिचा डिजिटल डेब्यू होता.

5) कहने को हमसफर है 2-  या सीरिजमध्ये कसौटी जिंदगी की 2 मधील भाऊ बहिण साकारणारे पार्थ समथान आणि पूजा बॅनर्जी यांचा लिपलॉक किसिंग सीन होता. यानंतर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अनेकांनी सवाल केला की, एका शोमधील भाऊ बहिणींना दुसऱ्या शोमध्ये असं किस करताना कसं दाखवलं जाऊ शकतं.