अबब ! हुवेईचा ‘विक्रमी’ सेल, 1.5 कोटींहून जास्त 5G स्मार्टफोनची विक्री

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाइन – २०२० च्या हुवेई ग्लोबल अ‍ॅनालिस्ट समिटचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या समिटमध्ये कंपनीच्या उपसंचालकांनी हुवेईने 5G क्षेत्रातील कंपनीच्या कामगिरीबद्दल माहिती दिली. हुवेईने २०२० च्या पहिल्या तिमाहीत १५ मिलियन म्हणजेच दीड कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ती चीनच्या 5G मार्केटमध्ये प्रथम क्रमांकावरती पोहचली आहे. चीनच्या 5G मार्केटमधला ५५.४ टक्के भाग हुवेईने व्यापला आहे. तर जगभरातील 5G मार्केटमधील ३३ टक्के भाग हुवेईने व्यापला आहे. कंपनीने आतापर्यंत १९ पेक्षा अधिक 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. या स्मार्टफोनची किंमत २००० युआन (२१,३१७ रुपये) आणि १६,००० युआन (१,७०,५२२ रुपये) या दरम्यान आहे.

अमेरिका आणि हुवेई यांच्यातील वाद सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, हुवेईने अमेरिकेतील आपलं सर्व काम बंद ठेवलं आहे. मात्र, अमेरिकन सरकार हुवेईवरील बंदी कठोर करत असल्याचे दिसत आहे. मागील वर्षी अस्तित्वाच्या यादीमध्ये समावेश केल्यासपासून हुवेईचे स्मार्टफोन Googel मोबाईल सेवा (जीएमएस) वापरू शकत नाही. तसेच अलीकडेच अमेरिकन सरकारने सांगितल्यानुसार, अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कोणत्याही कंपनीने हुवेई साठी काम करण्यापूर्वी अमेरिकन सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.

भारतामध्ये लाँच झाली हुवेई वॉच GT 2e

कंपनीने नुकतीच भारतात हुवेई वॉच GT 2e लाँच केली असून, यात विविध सेगमेंटमध्ये हे नवीन डिव्हाईस अ‍ॅड केलं आहे. कंपनीने यावरती अनेक ऑफर दिल्या आहेत. याला अमेझॉन किंवा फ्लिफकार्टवरून प्री-ऑर्डर केले जाऊ शकते. या स्मार्टवॉच ला ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर अनेकांना AM61 ब्लूटूथ इयरफोन फ्री मध्ये दिलं जात आहे. यामध्ये ग्रे फाइट ब्लँक, लावा रेड, मिंट ग्रीन आणि आयसी व्हाईट कलरमध्ये खरेदी केलं जाऊ शकते.

तसेच या Huawei Watch 2e ची किंमत भारतमध्ये ११ हजार ९९ रुपये आहे. यावरती अनेक ऑफर्स दिल्या असून, फ्लीफ्कार्ट आणि अमेझॉनवर या स्मार्ट वॉचला ऑनलाइन प्री-ऑर्डर केलं जाऊ शकत. दोन्ही प्लॅटफॉर्मवरती ग्राहकांना १२ मे पासून २८ मे पर्यंत खरेदी करणाऱ्यांना ६ महिने नो कॉस्ट ईएमआय पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर कंपनीने १५ मे ते २१ मे दरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३,९९० रुपये किंमत असलेला AM61 ब्लूटूथ इयरफोन फ्री देणार असल्याचं सांगितलं.