काय सांगता ! होय, ‘ही’ कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना देणार दुप्पट ‘पगार’ आणि 2044 कोटींचा बोनस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील दुसरी मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी हुवावे आपल्या कर्माचाऱ्यांच्या टीमला 28.6 कोटी डॉलर (2044 कोटी रुपये) बोनस देणार आहे. हा बोनस कंपनी अमेरिकेतील बंदीच्या अडचणींपासून उभरण्यासाठी प्रयत्नात असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना देणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे पैसे कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमला मिळू शकतात. ही टीम कंपनीच्या युएसवर असणाऱ्या निर्भरतेला शिफ्ट करण्याच्या प्रयत्नांवर काम करत आहे. रॉयटर्सने मंगळवारी ही माहिती दिली की, यात असंही म्हटलं आहे की, हुवावे आपल्या सर्व 1.90 लाख कर्मचाऱ्यांना या महिन्यात दुप्पट वेतन देणार आहे.

अमेरिकेने हुवावेला मेमध्ये ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं होतं, काय आहे प्रकरण ?
हुवावेचं म्हणणं हे की, ते अमेरिकन हार्डवेअरला पर्याय शोधत आहेत. अमेरिकेने हुवावेला मेमध्ये ब्लॅकलिस्ट करत तेथील कंपन्यांशी व्यापार करण्यावर बंदी आणली होती. यामुळे हुवावेची अडचण होऊ लागली होती. कारण ती आपल्या उपकरणांमधील प्रमुख पार्ट्सच्या सप्लायसाठी अमेरिकन कंपन्यांवर अवलंबून होती.

हुवावेवरील बंदीविरोधात अमेरिकेने युक्तिवाद केला होता की त्याच्या उपकरणांमुळे सुरक्षा धोक्यात आली आहे. युएसचं म्हणणं होतं की, हुवावेचे फाऊंडर रेन झेंगफे यांची चीन सरकारसोबत जवळीक आहे. अमेरिकेने हुवावेच्या उपकरणांपासून हेरगिरीचा धोका असल्याचंही म्हटलं आहे. कंपनीने मात्र ही शंका नाकारली होती.

हुवावे जगातील दुसरी मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. स्मार्टफोनची विक्री वाढल्याने त्यांचा रेव्हेन्यू जुलै-सप्टेंबर तिमाहीत 27 टक्के वाढला होता. कंपनीने गेल्या महिन्यातच परिणामांची माहिती दिली होती.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like