‘इंडिया इज ग्रेट’ ! ‘या’ ठिकाणी एकाच छताखाली साजरा होतो ‘गणेशउत्सव’ आणि ‘मोहरम’

पोलीसनामा ऑनलाइन – भारत हा सर्व धर्म समभाव मानणारा देश आहे. मात्र अलीकडच्या काळात जातीय मतभेद वाढीला लागल्याचे चित्र दिसू लागले होते मात्र कर्नाटकातील हुबळी हे ठिकाण याला अपवाद आहे. कारण कर्नाटकातील हुबळी येथे एकाच छताखाली येऊन गणोशोत्सव आणि मोहरम साजरी केली जाते.

जातीय सलोख्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून, हुबळी जिल्ह्यातील खेड्यातील लोकांनी गणेश चतुर्थी साजरी केली आणि त्याच छताखाली मोहरम पाळला.

येथील स्थानिक मोहम्मद शाम यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, “आम्हाला जातीय सलोख्याचा संदेश द्यायचा आहे जो या वेळी खूप महत्वाचा आहे.”

या गावात हिंदू आणि मुस्लिम दोघेही एकाच ठिकाणी एकत्र जमतात, जिथे गणेश चतुर्थी आणि मोहरमची व्यवस्था केली गेली आहे. याठिकाणी दोन्ही समुदाय एकाच छताखाली प्रार्थना करतात.

“या गावात सुमारे  4,000 लोकसंख्या आहे आणि आम्ही सर्व समरसपणे जगतो. येथे, समुदाय एकत्र काम करतात,” असे मंडळात प्रार्थना करण्यासाठी आलेल्या दुसर्‍या भाविकांनी सांगितले.