Video : आश्चर्यकारक ! ‘हफ पॅरानॉर्मल’चे स्टीव हफ यांनी केला दिवंगत स्टार सुशांतच्या आत्म्यासोबत बातचित केल्याचा दावा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हफ पॅरानॉर्मल (Huff Paranormal) चालवणारे स्टीव हफ (Steve Huff) यांनी आजवर अनेकदा मृत व्यक्तींच्या आत्म्यासोबत संपर्क साधल्याचा दावा केला आहे. खास बात अशी की, गेल्या 10 वर्षांपासून ते हे काम करत आले आहेत. यासाठी त्यांच्याकडे अनेक साधनं आहेत. त्यांनी आता असं सांगितलं आहे की, त्यांनी बॉलिवूमधील दिवंगत स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्म्यासोबत बातिचत केली आहे.

स्टीवनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते सुशांतसोबत संपर्क साधताना दिसत आहेत. सुशांत त्यांच्याशी बोलत आहे असं त्यात दाखवलं गेलं आहे. यात स्टीव म्हणत आहेत की, ते सुशांतला ओळखत नाहीत. परंतु अनेकांचे मला मेसेज आले की मी सुशांतसोबत संपर्क साधावा.

व्हिडीओत दिसत होतं की, ते सुशांतसोबत बोलत आहेत. त्यांना जो काही प्रतिसाद येत आहे तो सुशांतचा आहे असा दावाही त्यांनी केला आहे. व्हिडीओत हे सारं काही पहायला मिळत आहे की, कशा प्रकारे ते सुशंताच्या आत्म्यासोबत संपर्क साधत आहेत. सुशांत असं बोलताना ऐकून येत आहे की, चाहत्यांचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. शेवटी एका महिलेचा आवाज येत आहे जी म्हणते आहे की, इट्स एंडिंग.”

इथं पहा व्हिडीओ-

स्टीव यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना असं आश्वासन दिलं आहे की, ते लवकरच याचा फॉलोअपही घेतील. याआधीही स्टीव यांनी मायकल जॅक्सन आणि पॅट्रीक स्वेज यांच्या आत्म्यासोबत संपर्क साधल्याचा दावा केला होता.