गणपती विसर्जना दिवशी पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यासह ग्रामीण भागातील गणेशोत्सवाची सांगता रविवारी (दि. २३) होणार आहे. पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये २ हजार ८५ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. गणेश मंडळांकडून गणपतीचे विसर्जन करण्यासाठी मिरवणूक काढण्यात येते. विसर्जन मिरवणूक आणि गणपती मूर्तींचे विसर्जन ठिकाणावर पुणे ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’01baaf33-be6b-11e8-9b51-739c2464594e’]

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील १ पोलीस अधिक्षक, २ अप्पर पोलीस अधिक्षक, १० पोलीस उप अधिक्षक, २०० पोलीस अधिकारी, २ हजार ३०० पोलीस कर्मचारी, १ हजार होमगार्ड, ६०० विशेष पोलीस अधिकारी, १ एस.आर.पी.एफ. तुकडी, १० स्ट्रायकिंग फोर्स, ४ दंगा विरोधी पथके असा बंदोबस्त गणपती विसर्जनादिवशी असणार आहे.
गुन्हेगारांवर प्रितिबंधात्मक कारवाई

गणपती विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी ग्रामीण पोलिसांकडून गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांनी विविध गुन्ह्यातील ४ हजार ३१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये ५१३ जणांना पुणे जिल्ह्या बाहेर काढण्यात आले आहे.

अन्यथा … गणपती नाही तर, सरकारचे विसर्जन

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’630533c2-be70-11e8-9290-b1f13aac481f’]
ड्रोन कॅमेऱ्याची नजर

गणपती विसर्जन शांततेत व्हावे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे विसर्जन मिरवणूकीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना सुचना करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यामध्ये लाऊड स्पिकर व चित्रीकरणासाठी व्ही.डी. ओ. कॅमेरे देण्यात आले आहेत.

उच्चभ्रू कुटुंबाकडे खंडणी मागणारे दोन इंजिनियर वाकड पोलिसांच्या जाळ्यात

तर होणार कारवाई…
ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांना डी.जे. सीस्टीम वापरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मंडळांनी सुचनांचे आणि नियमांचे उल्लंघन करुन लाऊड स्पिकरचा आवाज वाढवल्यास नॉईस मिटर द्वारे धन्वी मापन करण्यात येणार आहे. यामध्ये  दोषी आढळणाऱ्या गणेश मंडळावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील ७ व्या ९ व्या दिवसांच्या गणपतींचे विसर्जन शांततेत पार पडले आहे. रविवारी (दि.२३) गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असून या दिवशी विसर्जन करणाऱ्या मंडळांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6d554788-be70-11e8-bb9c-07f0e4b71312′]