ठाणे येथील बायोसेंस कंपनीला आग

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाण्यातील बायोसेंस कंपनीला भीषण आग लागली असून या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेत. ठाणे पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी हि घटनास्थळी दाखल झालेत.
ही आग नेमकी कशामुळे लागली आहे? हे अद्याप कळू शकलेले नाही. अग्निशमनदलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्रामध्ये असलेल्या प्रशांत स्वीट कॉर्नरच्या गोडाऊनजवळ बायोसेंस ही कंपनी आहे. आग लागल्याची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाचे जवान, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापना विभागाचे अधिकारी, वागळे इस्टेट पोलिसांचे पथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले असून कंपनीतून सर्व कर्मचार्‍यांना सुखरूप बाहेर काढले आहेत.