पुणे : बिबवेवाडी स्मशानभूमी जवळ आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिबवेवाडी परिसरातील एका गोडाऊनमधील साहित्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणात असून, अग्निशमन दलाचे जवान फायर बंब घेऊन दाखल झाले आहेत.

बिबवेवाडी स्मशानभूमी जवळ एक सजावट साहित्याचे गोडाऊन आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात साहित्य आहे. आज दुपारी अचानक आग लागल्याचे नागरिकांना दिसून आले. त्यांनी ही माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान फायर बंब घेऊन दाखल झाले. 7 फायर गाड्या दाखल झाल्या असून, आग मोठ्या प्रमाणात भडकली आहे. ती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नेमके हे गोडाऊन कोणाच्या आहे, हे समजू शकलेले नाही.