शाहीर अमर शेख चौकातील मोठा फ्लेक्स कोसळुन 3 ठार ; 7 गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

जुना बाजाराजवळील शाहीर अमर शेख चौकातील मोठा फ्लेक्स कोसळला असून 3 जण ठार झाले आहेत तर, 7 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अनेक अ‍ॅटो रिक्षांचे मोठे नुकसान झाले असुन अग्‍नीशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. तर आणखी तिघे ट्रामा आयसीयू मध्ये आहेत. सहा ते सात हे जखमी आहेत अशी माहिती ससून हॉस्पिटलने दिली. या घटनेत दहा जण सापडले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मयत
1) शामराव गगांधार कासार, वय-७०
रा. पिपळे गुरव, पुणे
2) शाम राजाराम धोत्रे, वय ४५
रा. मदिना मापजेर, एम डी, देहूरोड कॅन्ट, पुणे,
3) शिवाजी देवदास परदेशी, वय- ४०
रा,२९१ नाना पेठ, पुणे

जखमी
1) किरण सोमनाथ ठोसर, वय -२२
रा, स.नं.७१, गरड वस्ती, अनुसया बनकर, हडपसर
2) यशवंत रामा खोबरे
रा, स.नं.८९/९० लोकमान्या कॉलनी, कोथरुड
कचरा डेपो, झोपडपट्टी कोथरुड
3)महेश औचेकर
रा. तुकाराम पालखी मंदिर जवळ, नानापेठ, पुणे
4) रुक्मीणी परदेशी
रा.२९१ नानापेठ, पुणे

इतर ३ जखमींची नावे अद्याप उपलब्ध झालेली नाहीत.

[amazon_link asins=’B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’18f7768a-c880-11e8-9f1f-3fd7c331d355′]

शाहीर अमर शेख चौकामध्ये अनेक फ्लेक्स असून त्यावर मोठ-मोठया जाहिरातीचे होर्डिंग लावण्यात आलेली आहेत. त्यापैकी एक मोठा फ्लेक्स कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. फ्लेक्स अचानकपणे कोसळल्याने अनेक अ‍ॅटो रिक्षाचे नुकसान झाले आहे. फ्लेक्स कोसळुन शामराव गंगाधर कासार (वय 70 वर्ष, रा. पिंपळे गुरव, पुणे), शाम राजाराम धोत्रे (वय 45 वर्ष, रा. मदिना मापजेर, एम डी, देहूरोड कॅन्ट, पुणे) शिवाजी देवदास परदेशी (वय 40 वर्ष, रा. 291 नाना पेठ, पुणे),  हे ठार झाले आहेत तर,  किरण सोमनाथ ठोसर (वय 22 वर्ष, रा. गरड वस्ती, अनुसया बनकर, हडपसर), यशवंत   6 ते 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.  गंभीर जखमी झालेल्यांना तात्काळ रूग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती अग्‍नीशमन दलाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. काही अ‍ॅटो रिक्षाचा चक्‍काचुर झाला आहे. उपलब्ध झालेल्या फोटोमध्ये सर्वकाही दिसत आहे. फ्लेक्स नेमका कशामुळे कोसळला हे समजु शकले नाही. मात्र, कोसळलेला फ्लेक्स जुना झाल्यामुळे तो कोसळला असावा असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B07CK51LT9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e23777e-c880-11e8-a324-ef9bbbf37c96′]

याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी काही वेळापुर्वी फ्लेक्स कोसळल्याची घटना घडली आहे मात्र अद्याप अधिक माहिती उपलब्ध झालेली नसल्याचे सांगितले. दरम्यान, फ्लेक्स कोसळल्यामुळे शाहीर अमर शेख चौकातील वाहतुक खोळंबली आहे. चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील वाहतुक काही वेळासाठी वळविण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे. वाहतुक शाखेच्या पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असुन चौकाला जोडणार्‍या काही रस्त्यावरील वाहतुक वळविली आहे.

या दुर्घटनेत आईचे अंत्यसंस्कार करून येत असणाऱ्या 2 मुली आणि वडील हे रिक्षातून घरी येत असताना त्यांच्या रिक्षावर हे होर्डिंग पडले वडील गंभीर जखमी आहेत सर्वांना ससून मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे

चेतन तुपे (विरोधी पक्ष नेते) :- मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेच्या जागेतील होर्डिंग कापायचे काम सुरू असताना ही दुर्घटना झाली. रेल्वेचे लोक हे होर्डिंग कापत होते. त्यामुळे रेल्वे वर कडक कारवाई झाली पाहिजे.

अरविंद शिंदे (काँग्रेस गटनेते) :- मालधक्का चौकामध्ये जे होर्डिंग कोसळलं ते रेल्वेच्या हद्दीतलं बेकायदेशीर होर्डिंग होतं पुणे मनपाने 2013 पासून त्यांना बेकायदेशीर आहे म्हणून अनेक वेळेला नोटिसा दिल्या कोर्टामध्ये दावा दाखल केलाय रेल्वे विरुद्ध त्यांच्या हद्दीमध्ये आत येऊन कारवाई करून देत नाही अशी पोलीस तक्रारही केली आहे म्हणून रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे आज रेल्वे अधिकारी हे होर्डिंग ची मुदत संपल्यामुळे दुसरा कुणालातरी द्यायचं म्हणून होर्डिंग दिवसाचा कापत होते पोलिसांना कल्पना दिली नाही पुणे मनपा कल्पना दिली नाही आणि मुख्य रहदारीच्या रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल ला उभे असताना नागरिकांचा जीव धोक्यात घातला त्याच्यामध्ये अनेक जखमी आणि दोन मृत्युमुखी पडले आहेत

सदानंद शेट्टी (स्थानिक, माजी नगरसेवक) :- रेल्वे अधिकारी दोषी आहेत. ही दुर्घटना झाल्यावर ते पळून गेले आहेत.