करदात्यांना मोठा दिलासा ! ITR फाईल करण्याची शेवटची तारीख 2 महिन्यांनी वाढली, आता 30 नोव्हेंबरपर्यंत मिळणार वेळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूच्या महामारीची सद्यस्थिती लक्षात घेता केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) आज मूल्यांकन वर्ष 2019-20 साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अंतिम मुदत वाढविली आहे. CBDT ने इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत आता 30 सप्टेंबर 2020 पासून वाढवून 30 नोव्हेंबर 2020 केली आहे. याआधी 29 जुलै रोजी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवण्याबाबत सीबीडीटीने बुधवारी एक अधिसूचना जारी केली आहे.

चार वेळा वाढली अंतिम मुदत

सलग चौथ्यांदा इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2020 पर्यंत होती. यानंतर ती 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली. नंतर ही मुदत दुसर्‍या महिन्यासाठी 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली. इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. आता इनकम टॅक्स डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, चौथ्यांदा ते 30 नोव्हेंबर करण्यात आली आहे.

यानंतर आता 2019-20 आणि 2018-19 या आर्थिक वर्षासाठी बिलेटेड/रिवाइज्ड इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची नवीन मुदत 30 नोव्हेंबर झाली आहे. आज सरकारने मुदत वाढविली नसती तर ज्यांनी अद्याप इनकम टॅक्स रिटर्न भरलेले नाही अशा लोकांसाठी अडचणी निर्माण झाल्या असत्या. हे देखील लक्षात घ्यावे लागेल की, 2018-19 या आर्थिक वर्षासाठी उशीरा इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 10,000 रुपये लेट फी देखील द्यावी लागेल. तथापि, एकूण उत्पन्न 5 लाखांच्या खाली राहिले तर जास्तीत जास्त लेट फी 1000 रुपये घेतली जाईल.

बिलेटेड किंवा रिवाइज्ड रिटर्न म्हणजे काय?

बिलेटेड रिटर्न कोणत्याही वित्तीय वर्षासाठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदतीनंतर भरला जातो. जर एखादा व्यक्ती रिवाइज्ड इनकम टॅक्स भरत असेल आणि टॅक्स सूट किंवा इनकमविषयी माहिती न देण्याची किंवा बँक खात्याची माहिती इत्यादींमध्ये चूक झाल्यास रिवाइज्ड रिटर्न भरला जातो. बिलेटेड आयटीआर इनकम टॅक्स अॅक्ट 1961 च्या कलम 1394 अंतर्गत भरला जातो. तर रिवाइज्ड रिटर्न 1395 च्या अंतर्गत भरला जातो.