पुणे बंगळुरु महामार्गावर भीषण अपघातात ६ ठार, २० जखमी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे बंगळुरु महामार्गावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून वेगाने आलेल्या लक्झरी बसने दिलेल्या धडकेत ६ जण ठार झाले असून २० जण जखमी झाले आहेत. पुणे -बंगळुरु महामार्गावर साताऱ्यांजवळील डी मार्टजवळ पूजा पेट्रोलपंपासमोर पहाटे साडेपाच वाजता हा अपघात घडला. अपघातातील जखमींना सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

पुणे बंगळुरु महामार्गावर जाणाऱ्या  ट्रकचा टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला तो थांबला होता. बेळगाव येथील एसआरएस टॅव्हल्सची ही बस आहे. लक्झरी बस पुण्याहून कर्नाटकात जात होती. अपघात घडला तेथे तीव्र उतार आहे. वेगाने जाणाऱ्या  बसच्या चालकाला पुढे थांबलेला ट्रक दिसला नाही. त्याने मागाहून जोरात ट्रकला धडक दिली. पहाटेच्या सुमारास स्लिपर कोचमधील सर्व प्रवासी झोपेत होते. ही धडक इतकी जोरात होती की, बसचा पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला. अपघाताचे वृत्त समजताच सातारा तालुका पोलीस घटनास्थळी पोहचले.

त्यांनी जखमींना तातडीने सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यातील ६ जणांचा मृत्यु झाला होता. काही जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला करुन रस्ता मोकळा करुन दिला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like