Traffic Jam in Wagholi | वाघोली मध्ये प्रचंड वाहतूक कोंडी, सकाळच्या सुमारास चाकरमान्यांचे प्रचंड हाल

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात तब्बल अडीच-तीन महिन्यांनंतर आजपासून (सोमवार दि. ७ ) लॉकडाऊन शिथील करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये वर्गवारी केली आहे. त्यानुसार आज लॉकडाऊन उघडताच नागरिकांना वाहतूक कोंडीला Traffic Jam सामोरे जावे लागत आहे. पुणे – नगर महामार्गावर वाघोली येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी Traffic Jam झाल्याचे आज पाहायला मिळाले.

पुणे जिल्ह्यात निर्बंध शिथील झाल्यामुळे रस्त्यावरील वर्दळ मोठ्याप्रमाणावर वाढली आहे.
त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी Traffic Jam झाली आहे.
पुणे – नगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सकाळी सात वाजल्या पासून पाहायला मिळाले.
पुणे नगर रोडने वाघोली परिसरात नगररोडच्या दोन्ही साईटने वाहतूक कोंडी झाली होती.
यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते.
यामध्ये रुग्णवाहिका ही अडकल्याचे दिसून आले होते.
तर वाहतुकीचा वेग देखील मंदावला आहे.

त्यातच वाघोलीच्या परिसरात महामार्गाचे काम चालू असून ठेकेदाराने अनेक ठिकाणी अर्धवट कामे केल्यामुळे याचाही फटका वाहन चालवताना बसला.
आणि नाहक वाहतुक कोडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
तर नव्यानेच पुणे शहर पोलिस दलात समावेश झालेल्या लोणीकंद वाहतूक पोलिसांचे देखिल याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
त्यामुळे रस्ता रुंदीकरण होऊन देखील नियोजनाच्या अभावामुळे वाघोलीकराना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. जर यात सुधारणा झाली नाही. तर रुंदीकरण होऊन देखील वाहतूक कोंडीचा सामना वाघोलीकरांना करावाच लागेल.

Also Read This : 

 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने मोठी दुर्घटना; 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या