अभिनेत्री सौंदर्या शर्मा बिना ब्लाऊजची साडी घातल्यानं प्रचंड ‘ट्रोल’ !

पोलीसनामा ऑनलाईन :अभिनेत्री सौंदर्या शर्मा एक मल्टी टॅलेंटेड कलाकार आहे. व्यवसायानं डेंटिस्ट असणाऱ्या सौंदर्यानं अभिनयातही तिची वेगळी ओळख तयार केली आहे. बॅचलर ऑफ डेंटल स्टडी केल्यानंतर सौंदर्या शर्मा हिनं दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये काम केलं आहे.

अशातच एका ऑडिशनसाठी तिनं मुंबई गाठली होती. इथं आल्यावर तिला जाणवलं की, अॅक्टींग मध्ये करिअऱ करायला हवं. यानंतर तिनं पुढील पावलं टाकली. सध्या सौंदर्या शर्मा आपल्या काही फोटोंमुळं ट्रोल होताना दिसत आहे.

सौंदर्यानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तिनं हिरव्या रंगाची साडी घातली आहे. सौंदर्या खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. यात तिनं ब्लाऊज घातलाच नाहीये ज्यामुळं ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट केल्या आहेत.

दरम्यान चर्चेत येण्याची सौंदर्याची ही तशी काही पहिलीच वेळ नाही. या आधीही ती अनेकदा चर्चेत आली आहे. तिचे फोटो नेहमीच हॉट अंदाजातले असतात जे चाहत्यांना खूप आवडतात. तिनं फोटो टाकला की, लगेच तो व्हायरल होताना दिसत असतो. असंच काहीसं साडीवाल्या फोटोंच्या बाबतीतही पाहायला मिळालं आहे.