TV अँकर मुस्लिम असल्याने ‘हम हिंदू’ संघटनेच्या संस्थापकांनी डोळे झाकून घेतले (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात हिंदू मुस्लिम द्वेष सातत्याने वाढत असल्याचा प्रत्यय विविध घटनांमधून येतोय. दोन दिवसांपुर्वीच डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्याने एका व्यक्तीने ऑर्डर रद्द केली होती ही घटना ताजी असतानाच आता अजून एक अशाच प्रकारची घटना घडली आहे. ‘हम हिंदू’ संघटनेचे संस्थापक अजय गौतम यांनी न्यूज 24 या वाहिनीवर लाईव्ह शो चालू असताना मुस्लिम अँकर आहे म्हणून डोळे झाकून घेतले. अँकरचे नाव मोहम्मद खालिद आहे.

अजय गौतम यांना न्यूज 24 च्या स्टुडिओत झोमॅटो संदर्भात घडलेल्या घटनेवर चर्चा करायला बोलवण्यात आले होते. न्यूज 24 चॅनेलने येथून पुढे अजय गौतम यांना चर्चेसाठी न बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, कार्यक्रम घेणारे संपादक न्यूज अँकरला सांगतो, अजय गौतम तुम्हाला पाहणार नाहीत कारण तुमचे नाव खालिद आहे पण तुम्ही चिंता करू नका. शो चालू ठेवा.